लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅनलाईन फार्मसीविरोधात ‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट्स’ या संघटनेतर्फे गुरुवारी रात्री १२ वाजतापासून एक दिवसीय संप पुकारल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसला. तीन हजारांवर औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांवर औषधांसाठी धावाधाव करण्याची वेळ आली. सर्वात जास्त फटका बसला तो आकस्मिक रुग्णांना. विशेष म्हणजे, मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने व परिसरातील दुकाने बंद असल्याने अनेकांना गांधीबाग येथील संघटनेच्या कार्यालयात धाव घ्यावी लागली.‘आॅनलाईन व ई फार्मसी’मधून मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या, नार्कोटिक्स ड्रग्ज, कोडीन सिरप, आणि गर्भपाताची औषधे सहज विकत घेतली जाऊ शकतात. या माध्यमातून औषधांचा दुरुपयोग होण्याची जास्त शक्यता असल्याचे कारण समोर करीत याला विरोध म्हणून ‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट्स’ संघटनेच्या आवाहनावरून ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने गुरुवारी संपाची हाक दिली. संघटनेच्या फार्मसी कौन्सिलचे कार्यकारिणी सदस्य हरीश गणेशानी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, १०० टक्के बंद यशस्वी राहिला. जिल्ह्यातील ३१०० औषधांची दुकाने बंद होती, असा दावाही त्यांनी केला. हा संप रुग्णांना वेठीस धरण्यासाठी नव्हता तर जनतेचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होता. म्हणूनच असोसिएशनतर्फे गांधीबाग येथील औषधे बाजारात ‘इमरजन्सी’ रुग्णांसाठी औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती, असेही ते म्हणाले.दरम्यान सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संविधान चौकात ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी,औषध विक्रेत्यांनी काळे टी शर्ट घालून धरणे-आंदोलन केले. दुपारनंतर संघटनेचे शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकाºयांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळात असोसिएशनचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे, हरीश गणेशानी, नागपूर जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कावडकर, सचिव हेतल ठक्कर यांच्यासह पारस मेहता, वीरभान केवलरामानी, शैलेश गहलोद, संजय खोब्रागडे, धनंजय जोशी, विकास ओबेरॉय, हिमांशु पांडे आदींचा सहभाग होता. गुरुवारी रात्री १२ वाजतापासून बहुतांश औषधांची दुकाने बंद असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती.मंगळवारी मेयो, मेडिकल प्रशासन संपाची माहिती नसल्यासारखेच वागले. या दोन्ही रुग्णालयात येणाऱ्या