शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

उच्च शिक्षण सहसंचालकांविरोधात प्राध्यापकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:43 PM

लॉकडाऊनमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालये बंद असून प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले होते. लॉकडाऊनदरम्यान केलेली कामे व पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमासंदर्भात माहिती सादर करण्याचे निर्देश विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आले होते. याबाबत आवश्यक तपशील अनेक महाविद्यालयांकडून सादर करण्यात आले असले तरी सहसंचालक डॉ. एम. एस. साळुंखे यांच्या भूमिकेबाबत प्राध्यापकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

ठळक मुद्देशिकवलेल्या अभ्यासक्रमाचे मागितले होते तपशील : विद्यापीठातर्फे का मागविली नाही माहिती ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालये बंद असून प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले होते. लॉकडाऊनदरम्यान केलेली कामे व पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमासंदर्भात माहिती सादर करण्याचे निर्देश विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आले होते. याबाबत आवश्यक तपशील अनेक महाविद्यालयांकडून सादर करण्यात आले असले तरी सहसंचालक डॉ. एम. एस. साळुंखे यांच्या भूमिकेबाबत प्राध्यापकांमध्ये नाराजीचा सूर आहे.या सत्रामध्ये शिकवलेल्या अभ्यासक्रमाची (पारंपरिक पद्धतीने/ऑनलाईन) माहिती महाविद्यालयांना मागवली होती. तसे पत्र उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आले होते. प्रपत्र अ नुसार अभ्यासक्रमाची माहिती देण्यास प्राध्यापक वर्गाने सहमती दर्शवली होती. मात्र, यासोबत असलेल्या प्रपत्र ब मध्ये प्राध्यापकांनी लॉकडाऊनच्या काळात कुठले काम केले, किती वेबिनारला उपस्थिती लावली, संशोधनात्मक कार्य काय होते, इत्यादीची माहिती मागविण्यात आली होती. याला नुटातर्फे विरोध करण्यात आला होता. मुळात सहसंचालकांना ही माहिती मागविण्याचा अधिकारच नाही. अभ्यासक्रमाची माहिती विद्यापीठाने मागितली असती तर ती लगेच दिली असती. मात्र सहसंचालकांचे अभ्यासक्रमाशी काहीच देणेघेणे नाही, अशी भूमिका संस्थेने घेतली होती.यानंतर सहसंचालकांनी नवे पत्र काढले. त्यानुसार केवळ अभ्यासक्रमाची माहिती तात्काळ सादर करा व इतर माहिती महाविद्यालय स्तरावर जमा करावी अशी सूचना केली. अनेक महाविद्यालयांनी अभ्यासक्रमाची माहिती सादर केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी सहसंचालकांशी संपर्क होऊ शकला नाही.शैक्षणिक कॅलेंडरमध्ये बदल कुठे ?लॉकडाऊनच्या कालावधीत काय काम केले यासंदर्भात माहिती मागविण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन तर अद्यापही सुरू आहे व विद्यापीठाच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार शैक्षणिक सत्र संपले आहे. या स्थितीत प्राध्यापकांनी सत्र संपल्यावर काय काम केले याची माहिती कशी द्यावी हा आमचा आक्षेप होता. शिवाय विद्यापीठाने शैक्षणिक कॅलेंडरमध्ये बदल केलेले नाहीत. त्यामुळे माहिती देणे क्रमप्राप्त नव्हतेच, असे नुटाचे उपाध्यक्ष डॉ.नितीन कोंगरे यांनी सांगितले.

टॅग्स :Professorप्राध्यापकRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज