लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : पाेलीस पथकाने डाेंगरगाव पारधी बेड्यावर कारवाई करीत माेहफुलाची अवैध दारूभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत पाेलिसांनी सहा आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदवून, त्यांच्याकडील माेहफुलाची दारू, रसायन सडवा व इतर साहित्य असा एकूण दाेन लाख सहा हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.२४) सकाळच्या सुमारास करण्यात आली.
डाेंगरगाव पारधी बेड्यावर माेहफुलाची दारूभट्टी लावून माेठ्या प्रमाणावर दारूची अवैध विक्री केली जात असल्याची सूचना काटाेल पाेलिसांना मिळाली. त्याआधारे त्यांनी डाेंगरगाव बेड्यावर धाड टाकली असता, आराेपी माेहफुलाची दारू गाळताना आढळून आले. आराेपींविरद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नाेंदवून दारुभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत एक लाख १६ हजार ७०० रुपये किमतीची माेहफुलाची दारू व रसायन सडवा, ७५ हजाराचे १२५ नग लाेखंडी व प्लास्टिक ड्रम तसेच १५ हजार रुपये किमतीचे दारू गाळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण दाेन लाख सहा हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली.
याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बाेंद्रे, लभाने, पाेलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार यांच्या नेतृत्वातील पाेलीस पथकाने केली.
240721\img-20210724-wa0047.jpg
डोंगरगाव बेड्यावरील अवैध मोहफुल भट्टीवर धाड