रामटेक : राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य याेजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या विधवा महिलांना शासनाकडून प्रत्येकी २० हजार रुपये देण्यात आले. आ. आशिष जयस्वाल यांनी रामटेक तालुक्यातील एकूण ५२ लाभार्थी महिलांना २० हजार रुपयांच्या धनादेशाचे नुकतेच वितरण केले.
या याेजनेच्या लाभापासून दारिद्र्य रेषेखाली जगणारे काेणतेही कुटुंब वंचित राहू नये. दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबांना अंत्याेदय अन्न याेजनेच्या यादीत समाविष्ट करावे. या लाभार्थी कुटुंबांना दर महिन्याला ३५ किलाे धान्य देण्यात यावे. या यादीतील बाेगस लाभार्थ्यांना कमी करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमाला तहसीलदार बाळासाहेब मस्के, संजय गांधी निराधार योजनाचे अध्यक्ष विवेक तुरक, नायब तहसीलदार (संजय गांधी योजना), संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य देवानंद वंजारी, गजानन ढोरे, सुंदरबाई खडसे, सचिन खागर यांच्यासह अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.