जलालखेडा : स्थानिक एकता क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, यंगस्टार क्लब आणि अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी यांच्या वतीने जलालखेडा (ता.नरखेड) पाेलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे. यात ७०० तरुण-तरुणींनी नाेंदणी केली असून, यातील २५० तरुण व १५० तरुणी अशा एकूण ४०० तरुण-तरुणींना प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्वांना शनिवारी (दि. ६) आयाेजित कार्यक्रमात लेखी परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींना शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा व इतर महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, मयूर उमरकर, संजय चरडे, पाेलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, जाऊळकर, पंचायत समितीचे माजी सभापती वसंत चांडक, उदय बन्सोड, सतीश रेवतकर, अतुल पेठे, चिंटू धोटे, प्रकाश टेकाडे, गुलाम बानवा, संजय बडोदे, प्रवीण मोढोरिया, प्रताप वानखेडे यांच्यासह तरुण उपस्थित हाेते.
प्रशिक्षणार्थींना पुस्तकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:09 AM