शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

नागपुरात ३२ हजारांवर लाभार्थ्यांना ई-कार्ड वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 8:09 PM

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-कार्ड वितरणाची व्यवस्था महापालिकेच्या ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र व हेल्थ पोस्टमध्ये नि:शुल्क करण्यात आली आहे. आजवर ३२ हजारांवर ई-कार्ड वाटप करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ई-कार्ड वितरण सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, आरोग्यावरील खर्चापासून लोकांना संरक्षण मिळावे .यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-कार्ड वितरणाची व्यवस्था महापालिकेच्या ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र व हेल्थ पोस्टमध्ये नि:शुल्क करण्यात आली आहे. आजवर ३२ हजारांवर ई-कार्ड वाटप करण्यात आले आहे.ई-कार्ड वाटप १२३ सिटीझन सर्व्हिस सेंटरमार्फत सुरू आहे. यासाठी प्रति व्यक्ती ३० रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, महापालिकेने सुरू केलेल्या ई-कार्ड वितरणासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. लाभार्थी यासाठी पात्र आहे किंवा नाही याबाबतची माहिती जवळच्या आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेता येईल. अथवा https://mera.pmjay.gov.in/serch/login  या संकेतस्थळावर आपले नाव आहे किंवा नाही हे जाणून घेता येईल, अशी माहिती मनपाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी दिली.प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत महापालिका क्षेत्रात २३ खासगी व शासकीय रुग्णालये सेवा देणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या १३०० आजारांकरिता पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार देण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत सन २०११ च्या जातीनिहाय, सामाजिक, आर्थिक जनगणनेमधील काही निकषांवर आधारीत लाभार्थ्यांना दरवर्षी प्रती कुटुंबासाठी पाच लाखांपर्र्यंतचे आर्थिक कवच विमारूपाने उपलब्ध करण्यात आले आहे.यामध्ये नोंदणी व बेड शुल्क, नर्सिंग व बोर्डिंग शुल्क, सर्जन, भूलतज्ज्ज्ञ, वैद्यकीय आणि सल्लागार फी, रक्त संक्रमण, ऑपरेशन शुल्क, शस्त्रक्रिया उपकरणांची किंमत, औषधे, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, एमआयआर, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, डिस्चार्जनंतर १५ दिवसांपर्यंत चाचणी व औषध आदींचा समावेश आहे.महापालिकेंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी एकूण पात्र लाभार्थी २,१९,७७० आहेत. त्यापैकी आजपर्यंत ४२५०६ लाभार्थ्यांचे ई-कार्ड तयार झालेले आहे. उर्वरितांनी त्वरित जवळच्या महापालिका आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आपले नाव तपासून घ्यावे. असल्यास रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड किंवा कुठलेही शासकीय ओळखपत्र दाखवून ई-कार्ड तातडीने तयार करून घ्यावे, असे आवाहन सोनकुसळे यांनी केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका