कामठी : घाेरपड (ता. कामठी) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात स्थानिक महिलांना सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच तारा कडू, उपसरपंच अनिकेत वानखेडे, नीलेश ढोणे, आशा कुरुडकर, प्रकाश खांडेकर, गीता पांडे ,सुनीता कार्वेकर, भारती मानमुंडे, राजपल्लवी जयस्वाल, शारदा मोरे, मनीषा आगलावे, मुबारक अन्सारी, विशाल वानखेडे, लव वानखेडे, तेजस मेश्राम, प्रगती तिडके, अश्विनी तांडेकर उपस्थित होते. महिलांना शासनाच्या विविध याेजनांसाेबतच जीत सुरक्षा किटबाबत माहिती देण्यात आली. शिवाय, गावातील २०० महिलांना या सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले. कुणाल कडू यांनी प्रास्ताविकातून या कार्यक्रमाच्या आयाेजनाचा उद्देश स्पष्ट केला. संचालन पंकज कुथे यांनी केले तर मयूर काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नागरिकांनी हजेरी लावली हाेती.