हिंगणा : नागलवाडी (ता. हिंगणा) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात गरजूंना शिलाई मशीन व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवाय, माेकळ्या जागेवर वृक्षाराेपणही करण्यात आले.
याप्रसंगी अनिल चानपूरकर, वीरश्री चानपूरकर, विक्रांत चानपूरकर व शौर्य चानपूरकर यांच्या हस्ते गावातील गरजूंना शिलाई मशीन, विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नाेटबुक, रजिस्टर, पेन, पेन्सिलचे वाटप करण्यात आले. वृक्षाराेपण करून राेपट्यांच्या संगाेपनाची जबाबदारीही स्वीकारण्यात आली. यावेळी सरपंच रेखा लापकाले, नाना लापकाले, किशोर बिडवाईक, चंदा आंबटकर, गजानन ढाकूलकर, भाऊ भांगे, इस्राईल महाजन, संतोष भागे, सोनू भगत, देवेंद्र सिरसाट, सुधाकर खंगार, अभिजित निघाेट, पंकजसिंह गौर, तृषाल दुरबुडे, भावेश कैकाडे, राम बंग, स्वप्नील लारोकर, कमलाकर मोहर्ले, तुषार चौरे, दिनेश दाभेकर, शुभम फलके, हर्षल धाकरे, रामू धाकरे, नितीन निघाेट, प्रभाकर उमरेडकर, शिवम खंगार, विक्की उमरेडकर, विशाल बांदरे, आकाश बोड्डे, शफी महाजन, रुनाल कैकाडे, चेतन बगडे, मोनू शेख, विक्की कैकाडे, महेश महाडिक, दत्ता शिर्के, जगदीश वानोडे उपस्थित हाेते. साक्षी चतुर यांची संचालन केले तर अश्विनी ढवळे यांनी आभार मानले.