नागपूर : गॅस कंपनीच्या बेजबाबदारपणाचे प्रकरण उपराजधानीत उघडकीस आले आहे. ग्राहकाला मुदत संपलेल्या गॅस सिलिंडर देण्यात आला असून चुकून हा प्रकार घडल्याचे गॅस एजन्सी मालकांचे म्हणणे आहे. मानकापूर येथील एका ग्राहकाने इंडेन कंपनीच्या रश्मी गॅस एजन्सीमधून ११ एप्रिल-२०१८ ला एलपीजी गॅस सिलिंडर घेतला होते. त्या वेळी त्यांनी सिलिंडरच्या वैधता तारखेची शहानिशा केली नाही आणि मे महिन्यात त्याचा उपयोग सुरू केला. २९ जुलैला सिलिंडर रिक्त झाल्यानंतर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली.अशी ओळखा वैधताइंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांच्या एलपीजी सिलिंडरमध्ये रेग्युलेटरजवळ तीन पट्टया असतात. यापैकी दोन पट्टयांवर सिलिंडरचे वजन आणि तिसऱ्या पट्टीवर एक्सपायरी तारखेची नोंद असते.यामध्ये वर्षातील १२ महिन्यांना ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ या चार गटांमध्ये विभागले आहे. ‘ए’चा अर्थ जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, ‘बी’चा अर्थ एप्रिल, मे, जून, ‘सी’चा अर्थ जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर आणि ‘डी’चा अर्थ आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असा होतो. ए, बी, सी आणि डी यांना जोडून लिहिलेली संख्या एक्सपायरी वर्षाची असते.>अधिकारी म्हणतात, आमच्याशी संबंध नाहीअन्नपुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी ही बाब वैद्यमापनशास्त्र विभागाची असल्याचे सांगितले. या विभागाला विचारले असता, उपनियंत्रक हरिदास बोकडे यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार देत, ही बाब विस्फोटक विभागाकडे येत असल्याचे सांगितले.
मुदत संपलेल्या गॅस सिलिंडरचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 4:56 AM