नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह दोघांना एक रुपयाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 08:53 PM2018-04-11T20:53:43+5:302018-04-11T20:54:06+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एका प्रकरणात प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे संचालक व जिल्हाधिकारी यांना वैयक्तिकरीत्या प्रत्येकी एक रुपयांचा दंड ठोठावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एका प्रकरणात प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे संचालक व जिल्हाधिकारी यांना वैयक्तिकरीत्या प्रत्येकी एक रुपयांचा दंड ठोठावला. कन्हान नदीवर पूल व अॅप्रोच रोड बांधण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह इतरांची जमीन संपादित करण्यात आली आहे. खरे अॅन्ड तारकुंडे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. त्याविरुद्ध सचिन अवस्थी व कमर आलम यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. सुनावणीदरम्यान वरील प्रतिवादींच्या वकिलांना अॅप्रोच रोडची रुंदी किती राहील, हे न्यायालयास सांगता आले नाही.