शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

जिल्हाधिकाऱ्यांनी नगर रचना अधिकाऱ्यांना फटकारले

By admin | Published: June 03, 2016 3:02 AM

सिव्हिल लाईन येथील प्रशासकीय इमारतीतील नगर रचना विभागाच्या कार्यालयासंदर्भात असलेल्या लोकांच्या तक्रारींची दखल घेत

तक्रारींची दखल : नगर रचना कार्यालयाची आकस्मिक तपासणी नागपूर : सिव्हिल लाईन येथील प्रशासकीय इमारतीतील नगर रचना विभागाच्या कार्यालयासंदर्भात असलेल्या लोकांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गुुरुवारी सायंकाळच्या सुमारास या कार्यालयाला आकस्मिक भेट देऊ न तपासणी केली. निर्देशानंतरही त्रुटी आढळून आल्याने विभागातील नगर रचना अधिकारी (विभाग-२) विनायक ठाकरे यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू केंद्राला या विभागामार्फत एसएमएस पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु निर्देशानुसार कार्यवाही होत नसल्याने कुर्वे यांनी या कार्यालयाला आकस्मिक भेट देऊ न कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संगणकांची तपासणी केली. कामकाजात त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी ठाकरे यांना चांगलचे फटकारले. इतर अधिकाऱ्यांनाही जाब विचारून कारवाईची तंबी दिली. यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. दरम्यान, नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांना अपशब्दात बोलून अपमान केल्याने याविरोधात शुक्र वारी सकाळी कार्यालयापुढे निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली. (प्रतिनिधी)विभागात दलालांचे राज्य नगर रचना विभागात दलालांचे राज्य असून, या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिक ांना वेठीस धरले जाते. याबाबतच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या विभागाची आकस्मिक तपासणी केली. दोषी आढळल्यास कारवाईशहरातील नागरिकांची प्रकरणे तातडीने निकाली निघावीत, यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. परंतु नगर रचना विभागासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी असल्याने या कार्यालयाची आकस्मिक तपासणी केली. तक्रारींची चौकशी सुरू आहे. यात दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल.- सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी