महात्मा गांधी शांतता पुरस्कार जाहीर नागपूर : राज्यात शांतता व जातीय सलोखा कायम ठेवण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगातर्फे देण्यात येणाऱ्या महात्मा गांधी शांतता पुरस्कारासाठी आयोगाने नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची निवड केली आहे. ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित समारंभात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.कुर्वे यांनी अल्पकाळातच आपल्या कार्याचा प्रभाव पाडला आहे. अलीकडच्या काळात नागपूर हे अतिशय महत्वाचे व संवेदनशील शहर म्हणून पुढे आले आहे. अशा परिस्थितीत आपल्या प्रशासकीय कौशल्यातून त्यांनी शहरातील शांतता व जातीय सलोखा टिकवून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.(प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना
By admin | Published: October 03, 2015 2:58 AM