पदोन्नती : वर्ग- २ चे अधिकारी झाले वर्ग -१नागपूर : जिल्हा परिषदेकडील महाराष्ट्र विकास सेवेतील वर्ग २ च्या ९६ सहायक गट विकास अधिकाऱ्यांना उपमुख्यकार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी अशा वर्ग -१ (क्लास वन) पदावर पदोन्नती देण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने काढले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.पंचायत समित्यांतील गट विकास अधिकारी हे पद वर्ग- १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. टप्प्याटप्प्याने ही पदे भरण्यात येणार आहे. यातील ९६ पदे भरण्याचे आदेश काढले आहे. यात जिल्ह्यातील एम.जी.जुवारे, पी. एम. बिरमवार, आर. एन. आनंदपवार, अरुण निंबाळकर, दिलीप भगत व जी.पी.चौधरी आदींचा समावेश आहे. जिल्ह्यातील काटोल, सावनेर, नरखेड, कुही, उमरेड व नागपूर जि.प.मधील सहा पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरच भरण्यात येणार आहे. पंचायत समित्यांमार्फत विविध विकास योजनांवर वर्षाला १५० कोटींचा निधी खर्च केला जातो. परंतु तालुका स्तरावरील तहसील हे वर्ग १ चे अधिकारी तर गटविकास अधिकाऱ्यांचा समावेश वर्ग २ मध्ये होता. गटविकास अधिकाऱ्यांचा वर्ग १ मध्ये समावेश करण्याची मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केली होती. याला यश आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहन चवरे यांनी दिली. (प्रतिनिधी)
जि.प.चे ९६ अधिकारी ‘क्लास वन’
By admin | Published: August 05, 2014 1:05 AM