अस्मिता कोठीवानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: दिवाळीनंतर नागदिवाळी हा कुळाचाराचा सण येतो. यालाच देवदिवाळी असेही म्हणतात. या सणाला विदर्भात दिव्यांची पूजा केली जाते व गुळशेले हा विशेष पदार्थ बनवला जातो.गुळशेलेची कृती पुढीलप्रमाणे आहे.साहित्य- गव्हाचे पीठ, साखर, लाल भोपळा, गूळ, दूध, वेलदोडा पूड, मीठ.कृती- गव्हाच्या पीठात मोहन घालून त्यात चवीपुरते मीठ व साखर घालून घट्ट भिजवावे. अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर तुपाचा हात लावून एकसारख्या मध्यम आकाराचे गोळे करावेत. काही गोळ््यांचे दिवे तयार करावेत तर काही गोळ्यांच्या थोड्या जाडसर पोळ््या लाटाव्यात. या जाड पोळीला तूप लावून तिचा रोल तयार करावा.एका पातेल्यात एक ग्लास पाणी घालावे. पातेल्याला पातळ कापड घट्ट बांधावे. त्यावर रोल व दिवे ठेवून वरून घट्ट झाकण ठेवावे. १० ते १५ मिनिटे वाफेवर शिजू द्यावेत.लाल भोपळा/ कोहळे किसून वाफवावे. त्यात गूळ, तूप व दूध घालून त्याचे गुळशेले (खीर) बनवावी. ती घट्ट येण्यासाठी तिला अगदी थोडे गव्हाचे पीठ लावावे. गुळशेले तयार झाले की तूप घालून नागदिव्यांसोबत गरमगरम वाढावे. अतिशय रुचकर व पोषक असा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो.
दिवाळी फराळ २०१८; नागदिवाळीचे दिवे किंवा गुळशेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 10:05 AM
दिवाळीनंतर नागदिवाळी हा कुळाचाराचा सण येतो. यालाच देवदिवाळी असेही म्हणतात. या सणाला विदर्भात दिव्यांची पूजा केली जाते व गुळशेले हा विशेष पदार्थ बनवला जातो.
ठळक मुद्देकुळाचाराचा पदार्थ