कळमेश्वर : भाेवळ आल्याने राेडवर पडून गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेरेवाडा रेस्क्यू सेंटर येथे बुधवारी (दि.२५) सकाळी १०.४० वाजताच्या सुमारास घडली.
रवींद्र किशाेरराव सनेसर (३५, रा. वाॅर्ड नं. ६ महेश काॅलनी, वरूड, हल्ली मु. हुमेश परिहार यांच्या घरी फेटरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. रवींद्र हा गाेरेवाडा रेस्क्यू सेंटर येथे केजेस क्रमांक १ ची साफसफाई करून केजेस क्रमांक २ मध्ये जात असताना अचानक भाेवळ येऊन राेडवर पडला. ताेंडाच्या भारावर पडल्याने त्याच्या नाकातून रक्त निघून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रतीक प्रमाेद गाटे (२४, रा. गाेरेवाडा रेस्क्यू सेंटर फाॅरेस्ट काॅलनी, क्वाॅर्टर नं. १) यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. पुढील तपास सहायक फाैजदार माेरेश्वर नागपुरे करीत आहेत.