शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

आता मागणार नाही, इंगा दाखवू

By admin | Published: August 30, 2015 2:42 AM

घटकपक्षांच्या मदतीने भाजपा सत्तेत आली आहे. आता मित्रपक्षांना किरकोळ समजले जात आहे.

संघभूमीत घटकपक्षांचा भाजपला इशारा : सरकार युतीचं आहे, महायुतीचं नाही नागपूर : घटकपक्षांच्या मदतीने भाजपा सत्तेत आली आहे. आता मित्रपक्षांना किरकोळ समजले जात आहे. भाजपने आपल्याला फसवलं आहे. यापुढे भाजपला मंत्री, महामंडळाची भीक मागायची नाही. हा विषयच इथचं बंद करू. इथून पुढे मागायचे नाही. गरज पडली तर इंगा दाखवू व भाजपची सत्ता उलटून टाकू, असा गर्भित इशारा महायुतीतील घटकपक्षांनी एकत्र येत भाजपला दिला. संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात घटकपक्षांनी एका मंचावर येत नेम साधल्यामुळे येत्या काळात भाजपची चिंता व डोकेदुखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा १२ वा वर्धापन दिन देशपांडे सभागृहात साजरा करण्यात आला. उद्घाटन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, रिपाइं (आ.) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे संयोजक आ. विनायक मेटे यांनी एका मंचावर येत एका सुरात भाजपला दम भरला. येत्या काळात मित्रपक्षांची एकजूट अधिक घट्ट करीत यापुढे भाजपला साकडे न घालता आपापला पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. रिपाइंचे महासचिव राजेंद्र गवई, रासपचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, आ. राहुल कुल, वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर या वेळी उपस्थित होते.या वेळी खा. आठवले म्हणाले, मंत्रिपदे द्यायची असेल तर द्या, नाही तर काय करायचे ते आम्ही ठरवू. महायुतीत भाजपने रिपाइंला आठ जागा दिल्या. मात्र, या सर्व जागांवर शिवसेना विजयी झाली. भाजपने आमच्या उमेदवारांना मते न दिल्यामुळेच पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला. खा. राजू शेट्टी म्हणाले, आपण केलेल्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यात अच्छे दिन आले असे म्हणणारा एकही माणूस भेटला नाही. आम्हाला लाल दिव्यातून फिरायची हौस नाही पण त्यातून सामान्य माणसाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे. घटकपक्षांमुळे सत्ता आली हे कुणीही विसरू नये. भाजपने आपल्याला आश्वासने देऊन फसवलं आहे. वेळ आली तर वाघनखं बाहेर काढू, अशा इशारा त्यांनी दिला. सदाभाऊ खोत यांनीही भाजपला घटकपक्षाच्या बळावर सत्तेत आल्याची जाणीव करून दिली. आमचं तर फाटलं आहेच, पण ज्याचं शाबूत आहे त्यांचंही फाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. शिवसंग्राम नेते आ. विनायक मेटे यांनी हे सरकार युतीचे आहे, महायुतीचे नाही. आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्र पेटविला. पण आता सरकार आल्यावर वाट पहावी लागत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. न्याय कसला देता, सत्तेत वाटा द्या, असे भाजपला ठणकावून सांगत आपसातील विसंवाद दूर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी घटकपक्षांकडून व्यक्त केली. संचालन बाळासाहेब दोडकल्ले यांनी केले. (प्रतिनिधी)मी राजीनामा देणार : जानकर जानकर म्हणाले, मला मिनिस्टर नाही, हिस्ट्री मेकर व्हायचे आहे.भाजपशी संबंध ठेवण्याची आता इच्छा नाही. माझा राग शिवसेनेवर नाही. भाऊ देवेंद्र फडणवीस व बहीण पंकजा मुंडेवर आहे. मी भीक मागायला येणार नाही. राजू शेट्टी म्हणेल त्या दिवशी राजीनामा देईल. तुम्ही तुमचं रामराज्य करा. मी राजीनामा देणार आहे, असा इशारा जानकर यांनी भाजपला दिला. जानकर म्हणाले, मी ८३ सभा घेतल्या. भाजपकडून हेलिकॉप्टरचे बिलही घेतले नाही. मात्र, सत्ता आल्यानंतर स्वाभिमान जपत मंत्रालयात पाऊलही टाकले नाही. शरद पवार यांनी आपल्याला दोन राज्यसभा, विधानसभेच्या १० जागा व २०० कोटी रुपये देण्याची आॅफर दिली होती. मात्र, आपण ते नाकारून गोपीनाथ मुंडेंची साथ दिली आणि शरद पवार आमच्यामुळे सत्ता गमावून आज बारामतीत पत्ते पिसत बसले आहेत, अशी आपल्या ताकदीची आठवण करून देत आता किती दिवस गप्प बसायचे, असा सवाल त्यांनी भाजपला केला. आतापासून शंभर मतदारसंघात पक्षाची बांधणी करू व किमान २५ जागा निवडून आणू. पुढील विधानसभेत विरोधी पक्षनेते राष्ट्रीय समाज पक्षाचा असेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भाजप आपल्याला लाचार समजत आहे. पण त्यांना कुणीही भीक मागू नका. वेळ आली तर मी माघार घेईल पण चार मित्रपक्षांची बांधलेली मोट सुटू देणार नाही. चारही घटक पक्षांची महिन्यातून एक बैठक घेऊ व समन्वयातून आपली ताकद वाढवू, असेही त्यांनी घटक पक्षाच्या नेत्यांना आश्वस्त केले.