शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

गर्दीमुळे भ्रमात राहू नका

By admin | Published: July 04, 2016 2:34 AM

सत्तेमुळे कामानिमित्ताने लोकांची गर्दी वाढते. ही लोकाभिमुखता नव्हे. या गर्दीमुळे महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कौल आपल्याच बाजूने लागेल,

मुख्यमंत्र्यांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान : जनतेशी संवाद साधानागपूर : सत्तेमुळे कामानिमित्ताने लोकांची गर्दी वाढते. ही लोकाभिमुखता नव्हे. या गर्दीमुळे महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कौल आपल्याच बाजूने लागेल, अशा भ्रमात राहू नका. जनसंवाद कार्यक्रम हाती घेऊ न नगरसेवक, आमदार व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कामाला लागावे, असे खडेबोल सुनावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. रजवाडा पॅलेस येथे आयोजित भाजपच्या नागपूर महानगर कार्यसमितीच्या बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. राज्याच्या विकासासोबतच पक्ष संघटना सक्रिय आहे. परंतु सत्तेत असताना जनतेसोबतचा संपर्क तुटतो. लोकप्रतिनिधी व जनता यांच्यातील संवादात अडथळा निर्माण होतो. हा अडथळा बाजूला सारून ‘मॅन टू मॅन’ व ‘हार्ट टू हार्ट’ संबंध जुळला पाहिजे. लोकांची गर्दी वाढली म्हणजे काम वाढले, असा अर्थ होत नाही. ही गर्दी मतपेटीत रूपांतरित होण्यासाठी जनसंपर्क वाढवा. या जोरावर महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवा, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून उपराजधानीचा कायापालाट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने अद्वितीय काम केले आहे. यामुळे पुढील तीन ते चार वर्षांत देशाचे चित्र बदलेल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून देशभरात रस्ते व बंदराचे जाळे उभारले जात आहे. रस्ता हा समृद्धीचा मार्ग असायचा, परंतु २१ वे शतक डिजिटल नेटवर्क राहणार आहे. ही बाब विचारात घेता जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी २ आॅक्टोबरला नागपूर जिल्हा डिजिटल केला जाणार आहे. पुुढील तीन वर्षांत राज्यातील २९ हजार ग्रामपंचायती डिजिटल नेटवर्कसोबत जोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)१०० कोटींचा निधी नागपूर शहरातील अनधिकृत ले-आऊ टमधील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या भागाच्या विकासासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून १०० कोटींचा निधी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील प्रत्येक घरापर्यत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकून शहर टँकरमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेनागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप व्हावे यासाठी राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. याचा शहरातील ३ ते ४ लाख लोकांना मोठा दिलासा मिळेल. त्यांना जागा व घराचे हक्क मिळणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. २०२०पर्यत बेघरांना घरेगेल्या दोन वर्षात केंद्र व राज्य सरकारने नागपूर शहराच्या विकासाला गती दिली आहे. प्रथमच नागपूर शहर केंद्र व राज्य सरकारच्या विकास अजेंड्यावर आले आहे. शहरात रस्ते व पुलाचे जाळे निर्माण होत आहे. मेट्रो रेल्वेचे काम गतीने होत आहे. मिहान, एम्स, आयआयएम, यासारख्या संस्था उभ्या राहात आहेत. नागपूरला शैक्षणिक हब करण्याचा संकल्प आहे. यातून मोठ्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. २०२० सालापर्यंत नागपूर शहरातील बेघर लोकांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध केली जातील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. दीड ते दोन वर्षात सर्व सेवा मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध होतील. यासाठी डिजिटल महाराष्ट्र करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिकांतही हा पॅटर्न राबविला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,खासदार अजय संचेती, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, अनिल सोले, गिरीश व्यास, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, नागो गाणार, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, पक्षाचे संघटनमंत्री रामदास आंबटकर, रवी भुसारी, संजय बंगाले, माजी महापौर अर्चना डेहनकर, कल्पना पांडे, जयप्रकाश गुप्ता यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकारिणीच्या बैठकीला पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.