शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

कुठल्याही समाजाविरोधात शत्रूत्व बाळगू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 6:52 PM

काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानून त्यापासून अंतर ठेवणे अयोग्य आहे. कुठल्याही समाजाविरोधात द्वेष किंवा शत्रूत्व बाळगू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.

ठळक मुद्दे'कोरोना'नंतर विकासाच्या नवीन 'मॉडेल'ची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाशी संपूर्ण देश सामना करत असताना काही भडकविणारे लोक काही समूहात क्रोध व भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून अतिवादी कृत्य होत आहेत. मात्र काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानून त्यापासून अंतर ठेवणे अयोग्य आहे. कुठल्याही समाजाविरोधात द्वेष किंवा शत्रूत्व बाळगू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. कुठल्याही समाजाचे नाव न घेता त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने त्यांनी रविवारी ऑनलाईन बौद्धिकातून आपली भूमिका मांडलीकोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शिस्तीचे पालन अत्यावश्यक आहे. देशातील काही भागात शिस्तपालनाची सवयच नसल्याने तेथे अद्याप स्थिती नियंत्रणात आलेली नाही. कोरोनाविरोधातील लढ्यात भारताचे काम चांगले होत आहे. शासन व प्रशासनाने तत्परतापूर्वक उपाययोजना लागू केल्या. समाजानेदेखील त्याचे पालन केले. आणखी काही काळ सर्वांनीच सकारात्मकपणे सहकार्य करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भडकविणाऱ्या लोकांच्या बोलण्यात न फसता भय व क्रोध दूर ठेवून एकत्रितपणे कार्य करावे. समाजात सद्भाव व शांतीचे वातवारण बनवावे, असे डॉ. भागवत म्हणाले. संघ स्वयंसेवक व समाजातील दात्यांनी कुठलाही भेदभाव न बाळगता प्रत्येक गरजूला मदत करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.संकटातून संधी शोधा, स्वदेशीवर भर द्याकोरोनाचे संकट सरल्यानंतर स्थिती बदललेली असेल. अनेक जण ग्रामीण भागात परतले आहेत. त्यांच्या रोजगारासाठीदेखील व्यवस्था करावी लागेल. हे संकट असले तरी यातून संधी शोधण्याची गरज आहे. विकासाचे नवीन मॉडेल शासनाला निर्माण करावे लागेल. विशेष म्हणजे स्वावलंबी होण्यासाठी स्वदेशीवरच भर द्यावा लागेल. त्यामुळे देशातच दर्जेदार उत्पादने तयार व्हावीत, यादृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. या संकटातून नवीन भारत घडवू शकतो, असे मत डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.पालघरप्रकरणी पोलिसांनी आपले काम करावेपालघर येथे संतांची झालेली हत्या ही दुर्दैवी बाब आहे. दोघेही संन्यासी धर्माचे आचरण करणारे होते. कायद्याला हातात घेणे कितपत योग्य आहे व पोलिसांनी काय करायला हवे, यावर विचार व्हायला हवा. पोलिसांनी याप्रकरणात आपले काम करावे. २८ तारखेला हिंदू धर्म आचार्य सभेने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आवाहन केले आहे. त्याचे आम्ही पण पालन करू, असे सरसंघचालकांनी सांगितले.प्रसिद्धीसाठी काम नकोलॉकडाऊन असले तरी संघ स्वयंसेवकांचे समाजात काम सुरू आहे. समाजानेदेखील गरजूंच्या मदतीसाठी तत्परतेने पुढाकार घ्यायला हवा. गरजूंची मदत करत असताना प्रसिद्धीसाठी कुठलेही काम करू नका. समाज व देश आपला आहे, या विचारातून स्वत:च्या आरोग्याचीदेखील काळजी घेऊन काम करा, असे सरसंघचालकांनी सांगितले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतAkshaya Tritiyaअक्षय तृतीया