शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

माझ्या शहराला बदनाम करू नका !

By admin | Published: December 24, 2015 3:21 AM

नागपूर हे क्राईम कॅपिटल झाल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात येत असलेली गुंतवणूक रोखण्याचा हा डाव आहे, ....

नागपूर : नागपूर हे क्राईम कॅपिटल झाल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात येत असलेली गुंतवणूक रोखण्याचा हा डाव आहे, असा थेट आरोप करीत माझ्यावर हवी तेवढी टीका करा पण माझ्या शहराला बदनाम करू नका, अशी भावनिक साद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना घातली. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील काही सदस्यांनी नागपूर हे क्राईम कॅपिटल झाल्याची टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या शहरातच गुन्हेगारी वाढली असून चेन लिफ्टिंगच्या वाढत्या घटनांमुळे महिलांना दुपारीही घराबाहेर पडणे कठीण झाल्याचे सांगत गृहमंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले होते. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी तेवढ्याच दमाने उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, नागपुरात गुंतवणूक वाढत आहे.त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे. मी नागपूरचा असल्यामुळे या शहराला लक्ष्य केले जात आहे. काहीतरी संयम असला पाहिजे. आकडेवारी तपासा, नागपूर शहरातील गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. ३४ गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. ८० जणांवर मोका लावण्यात आला आहे. चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न अशा घटनांमध्ये नागपूर राज्यात पहिल्या तीन शहरांमध्येही नसल्याचे सांगत नागपूर कधीही क्राईम कॅपिटल नव्हते, नाही आणि यापुढील काळातही तसे होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. किंबहुना राज्यातील एकही शहर क्राईम कॅपिटल होऊ दिले जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.