नागपूर : कर्जबाजारी होऊन छोटे मोठे व्यवसायिक वाहने घेऊन कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविणारे व्यावसायिक वाहन चालक आरटीओच्या नवनवीन नियमांमुळे चांगलेच वैतागले आहे.
आरटीओमध्ये व्यावसायिक वाहनांचे वर्षिक फीटनेस करावे लागते. त्याची फी ६०० रुपये आहे. परंतु फिटनेसला उशीर झाल्यास लाखो रुपयांचा दंड विभागाकडून वसूल केला जातोय. असे अनेक नियम व्यवसायिक वाहन चालकांसाठी डोकेदु:खी ठरले आहे. वाहन चालकांना वाहतूक पोलीसांना सांभाळतांना, आरटीओच्या नियमांचे पालन करताना, महागडे पेट्रोल डिझेल भरतांना वैतागले असून, त्यांचा संताप सोमवारी धरणे आंदोलनातून व्यक्त झाला.
दंड नको फाशीच द्या असा सूर ओवाळत संविधान चौकात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी, राज्य उपाध्यक्ष सचिन धोटे, शहर अध्यक्ष प्रभूदास डोंगरे, नितेश यादव, गजू टिपले, योगेश चौरसिया, जतिंदरसिंग सैनी, लवकुश शाहू, श्रींत दत्ता, रमेश शर्मा, शेखर ठाकरे, संदीप धांडे, सुशांत गोसेवाडे आदी सहभागी झाले होते.