नागपूरः तोंड, डोळ्यांमधील कोरडेपणा व थकवा ही लक्षणे ‘शॉग्रेन रोगा’ची आहेत. विशेषत: मध्यमवयीन महिलांमध्ये हा रोग दिसून येतो. याला ‘सिक्का सिंड्रोम’ असेही म्हणतात. पित्तविषयक ग्रंथींना सूज आल्याने ही समस्या निर्माण होते. या रोगामुळे रुग्णाला खूप त्रास होतो. त्यामुळे दुर्लक्ष नको. या रोगाचे योग्य निदान, तपासणी व उपचार आवश्यक आहेत.
-आजाराचे सामान्य कारण?
‘पॅरोटीड (पित्तविषयक) ग्रंथीं’मध्ये सूज येणे, ‘एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट’मध्ये (इएसआर) वाढ होणे, ‘अँटीन्यूक्लियर अँटीबॉडी’ची चाचणी व ‘रूमेटाइड फॅक्टर’ची चाचणी पॉझिटिव्ह येणे, ही ‘शॉग्रेन’ रोगाची प्राथमिक कारणे असू शकतात. हा एक प्रकारचा ‘ऑटोइम्यून डिसऑर्डर’ किंवा ‘कनेक्टिव टिश्यू डिसऑर्डर’चा हा प्रकार आहे.
-पॅरोटीड ग्रंथींमध्ये सूज, थकवा येण्याची कारणे?
गालगुंड (मम्स) ‘एचआयव्ही’ आणि ‘सायटोेमेगालोवायरस’ रोगांसारख्या विषाणूजन्य संसगार्मुळे ‘बायलेट्रल पॅरोटिड’ ग्रंथीमध्ये सूज येऊ शकते. ‘सारकॉइडोसिस’, ‘शॉग्रेन’ रोग, मधुमेह, जास्त मद्यपान, मूत्रपिंडाचा गंभीर आजार, वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्समुळे ‘पॅरोटीड’ वाढण्याचे कारण ठरू शकते.
-समस्या कशी समजून घ्यावी?
रुग्णाला विचारले पाहिजे की, त्याच्या डोळ्यात कोरडेपणा आहे का, डोळे दुखत आहे का?, या रोगाचे हे एक लक्षण आहे. काहींना कोरडे अन्न गिळताना त्रास होतो. घास गिळताना पाणी पिण्याची गरज पडते का, हे देखील विचारले पाहिजे.
-शॉग्रेन सिंड्रोमची इतर लक्षणे?
या आजारात सांध्यांना सूज आणि वेदनाही होऊ शकतात. अति थंडीमुळे काही लोकांच्या हाताची आणि बोटांचे पेर निळे पडू शकते. याला ‘रेनॉड फेनोमेनन’ म्हणतात. सुमारे ३० टक्के रुग्णांमध्ये पुरळ देखील दिसून येऊ शकतात.
-‘शॉग्रेन’ रोग लक्षणांशिवाय होऊ शकतो?
‘शॉग्रेन’ हा रोग लक्षणांशिवाय देखील काही स्त्रियांना होऊ शकतो. उच्च ‘इएसआर’सोबत ‘गॅमा ग्लोब्युलिन’च्या उच्च पातळीसह आणि ‘आरओ’ आणि ‘ला अँटिजन’च्या ‘अॅण्टिबॉडी’सह देखील होऊ शकतो.
-रुग्णाच्या तपासणीतून काय दिसून येते?
डोळ्यांतील स्राव कोरडे होणे, तोंड कोरडे पडणे, दात किडणे, पॅरोटीड ग्रंथीमध्ये सूज आल्याने कानाच्या पाठीमागे जडपणा जाणवणे, खालच्या पायांवर पुरळ येणे, सांधे सुजणे, वेदना होणे, फुफ्फुसातील फायब्रोसिसमुळे श्वासोच्छवासाचा त्रास होणे व ‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’ सारख्या समस्या रुग्णाच्या तपासणीतून दिसून येतात.
-रोगाचे निदानासाठी चाचण्या कोणत्या?
काही चाचण्या डोळ्यांतून वाहणारऱ्या अश्रूंचे मूल्यांकन करण्यासाठी केल्या जातात. ‘रोझ बँगल स्टेन’द्वारे ‘कोरोना स्टेन’ची तपासणी, ‘एएनए’ आणि ‘अँटी आरओ’ आणि ‘एलओअँटीबॉडी’ची चाचणी करणे आवश्यक असते. काही प्रकरणांमध्ये लाळ ग्रंथीची ‘बायोप्सी’ देखील गरजेची असते. सहसा ‘थायरॉईड फंक्शन टेस्ट’, ‘आरए फॅक्टर’, ‘कॉम्प्लिमेंट लेव्हल’ देखील तपासले जातात. काही रुग्णांच्या रक्तात ‘पोटॅशियम’ची कमतरता देखील असू शकते.
-रोगाचे व्यवस्थापन कसे केले जाते?
या रोगावरील उपचार सहसा लक्षणांच्या आधारे केले जातात. कृत्रिम अश्रू, साखर मुक्त च्युइंगम, काळजीपूर्वक दाताची स्वच्छता आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ टाळले पाहिजे.
जर डोळे, तोंड कोरडे पडत असेल, पॅरोटीड ग्रंथी वाढली असेल व सांधेदुखी यांसारखी लक्षणे एकत्र दिसू लागल्यास ही ‘शॉग्रेन’ रोगाची शक्यता ठरू असते. दुर्दैवाने यावर ठोस उपचार नाहीत. ‘निओप्लाझ्म’वर लक्ष ठेवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करणे आवश्यक ठरते.