नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तब्बल दहा मोर्च्यांनी विधानभवनावर धडक दिली. यात काँग्रेस पक्षासह धनगर समाज संघर्ष समिती, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, अंगणवाडी सेविका (आयटक) , आशा वर्कर (सीटू), दारुबंदी व्यसनमुक्ती आंदोलन समिती, आत्मा कंत्राटी कृती समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक कृती समिती व विना अनुदानित शाळा कृती समितीचा समावेश होता. यापैकी धनगर समाज संघर्ष समितीच्या मोर्चांत हजारो मोर्चेकरी सहभागी झाले होते. या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले होते. हा मोर्चा रात्री उशिरापर्यंत मोर्चास्थळी ठाण मांडून बसला होता. शिवाय विना अनुदानित शाळा कृती समितीचा मोर्चा रात्री उशिरापर्यंत मोर्चास्थळी होता. यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.
केवळ आश्वासने नका देऊ?
By admin | Published: December 09, 2015 3:29 AM