नागपूर : विजेचे भरमसाट वाढलेले बिल कमी करण्यासाठी वीज मीटरशी छेडछाड करणाऱ्या १३७६ ग्राहकांवर महावितरणने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून अडीच कोटीची वसुली केली असून, फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे.
महावितरणने केलेल्या या कारवाईत आढळले की बहुतांश लोकांनी मीटरचा वेग कमी करण्यासाठी मीटरला मॅग्नेट (चुंबक) व चीप लावलेली होती. काही ठिकाणी रिमोर्टचा उपयोग करण्यात आला होता. महावितरणनच्या नागपूर परिमंडळाने गेल्या तीन वर्षात ४२७० ग्राहकांवर कारवाई केली आहे. महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सांगितले, मीटरशी छेडछाड करणाऱ्यांवर आमची नजर आहे. कुणीही असले गैरप्रकार करू नये अन्यथा कारवाई होईल.
- तीन वर्षात झालेल्या कारवाया
वर्ष ग्राहकांच संख्या दंडात्मक वसुली
२०१८-१९ १४४६ २९९.९१ लाख
२०१९-२० ९१५ १७६.३८ लाख
मार्च २०२१ ते आतापर्यंत ४६१ ८४.२० लाख
- तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद, दंड सुद्धा
मीटरमध्ये छेडछाड करणे हे इलेक्ट्रीसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा आहे. कलम-१३५ अन्वये यात फौजदारी गुन्हा दाखल होतो. गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षाची शिक्षेची तरतूद आहे. अशा ग्राहकांकडून मीटर रिडींगच्या तुलनेत दुप्पट बिल वसूल केले जाते. प्रति केडब्ल्यू/एचपी नुसार औद्योगिक ग्राहकाकडून १० हजार रुपये, व्यापारी ग्राहकाकडून ५ हजार रुपये, कृषी ग्राहकाकडून १ हजार रुपये व अन्य ग्राहकांकडून २ हजार रुपये दंड वसूल केला जातो.