शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

शिक्षकांची अधिक ‘परीक्षा’ घेऊ नका ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 1:34 AM

शिक्षकांना देण्यात येणाºया वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीच्या निकषात शासनाने बदल केले आहे. सदर निकष अवाजवी व जाचक असून सदर शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी जोर धरला आहे.

ठळक मुद्देशालेय प्रगतीवर मिळणार शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी : शिक्षक संघटना आक्रमक; सरकारच्या निर्णयाचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षकांना देण्यात येणाºया वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीच्या निकषात शासनाने बदल केले आहे. सदर निकष अवाजवी व जाचक असून सदर शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी जोर धरला आहे. भाजपाच्याच शिक्षक सेलने हा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी उपसंचालकाकडे करून, घरचा अहेर दिला आहे. चटोपाध्याय आयोगाच्या शिफारशीनुसार शिक्षकांना विनाअट सरसकट निवड व वेतनश्रेणी लागू करावी आणि २३ आॅक्टोबर २०१७ चा शासन निर्णय तत्काळ रद्द करून, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली आहे.एकाच पदावर व एकाच वेतन श्रेणीत पहिली बारा वर्षे सतत सेवा करणाºया शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी तर त्यानंतर बारा वर्षे सतत एकाच पदावर व एकाच वेतन श्रेणीत सेवा करणाºया शिक्षकांना निवड श्रेणी देण्यात येते. पदोन्नतीकरिता पदाची पुरेशी संख्या उपलब्ध नसल्याने पद नाही तर किमान पदोन्नतीचा आर्थिक लाभ तरी मिळावा म्हणून शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी देण्यात येते. २३ आॅक्टोबर २०१७ च्याशिक्षण मंत्र्यांना घरचा अहेरशिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसंदर्भातील शासन निर्णय त्वरित रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन भाजपा शिक्षक सेलच्या वतीने शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांना देण्यात आले. भाजपा शिक्षक सेलने शिक्षणमंत्री विनोेद तावडे यांच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. यावेळी महाराष्ट्र संयोजिका डॉ. कल्पना पांडे, विदर्भ संयोजक डॉ. उल्हास फडके, विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर, प्रदीप बिबटे, ओमकार श्रीखंडे, विजय चकोले, चंद्रकांत तागडे, शेखर बावनकर, कवडू गुलाबे, किशोर कनोजिया, प्रमोद जोशी, प्रशांत राऊत, सतीश सांडे, प्रवीण पांडवकर उपस्थित होते.अनेक शिक्षक वेतन श्रेणीपासून वंचित राहणारनवीन शासन निर्णयामुळे अनेक शिक्षक वेतन श्रेणीपासून वंचित राहणार असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे, सुनील पेटकर यांच्यासह टिकाराम कडूकर, सुनील पाटील, शुद्धोधन सोनटक्के, राजेश बिरे, मनोज घोडके, स्वाती लोन्हारे, प्रमोद धांडोळे, राजेंद्र मरस्कोल्हे, लीलाधर सोनवाणे, सुधाकर मते, विलास भोतमांगे, चंद्रहास बडोने, शांताराम जळते, परसराम गोंडाणे, अनिल वाकडे, मुरलीधर कामडे आदींनी केली आहे.निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरणारशासनाचा निवड व वेतन श्रेणी संदर्भातील निर्णय भेदभाव करणारा आहे. शिक्षकांना लाभ मिळण्यापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे. या आदेशातील जाचक अटी त्वरित रद्द करण्यात याव्यात, अन्यथा शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष पुरुषोत्तम पंचभाई, खेमराज कोंडे, बाळा आगलावे, शिवराम घोती, आशिष महल्ले, सतीश दामोदरे, अब्दुल कौसर, अजहर हुसैन, तुकाराम इंगळे यांनी दिला आहे.