लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’ संसर्गामुळे उपराजधानीत दहशत माजली असून दररोज बाधितांचे आकडे वाढत आहेत. सरकारी व खाजगी इस्पितळांमध्ये बेडच नसल्याने अनेक रुग्णांना उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे. (Nagpur: Resident doctors of Govt Medical College&Hospital hold protest against District administration alleging shortage of oxygen beds, Remdesivir injections as COVID cases rise in the district)
उपचार सेवा व्यवस्थेकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या मुद्द्यावरून रविवारी रात्री मेडिकलच्या ‘मेडिसील कॅज्युएल्टी’समोर निवासी डॉक्टरांनी धरणे आंदोलन केले. रुग्णांसाठी अतिरिक्त उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्या, अशी त्यांची मागणी होती. सोमवारी दुपारी १ वाजता ते मनपा आयुक्तांची भेट घेणार आहेत.