लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थंडीचा जोर वाढलेला असता धुक्यामुळे रेल्वेगाड्याही २ ते १५ तास उशिराने धावत आहेत. वातावरणाच्या या बदलाचा फटका रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत असून १ डिसेंबर ते १४ जानेवारी या कालावधीत तब्बल १३४ प्रवासी प्रवासादरम्यान आजारी पडल्याने त्यांच्यावर रेल्वे रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार केले आहेत.थंडी आणि धुक्यामुळे उत्तर भारतासह इतर भागातून येणाऱ्या रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. वातावरण बदलल्यामुळे प्रवासात अनेक प्रवाशांची प्रकृती बिघडत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी ११० ते १३५ रेल्वेगाड्या दररोज ये-जा करतात. यात प्रवाशांची संख्या ४० ते ४५ हजार आहे. प्रवासात आजारी पडलेल्या प्रवाशांना रेल्वेकडून विविध रेल्वेस्थानकावर वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येते. वातावरणातील बदलामुळे डिसेंबर महिन्यात नागपूरवरून जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील ८७ प्रवासी आजारी पडल्याची नोंद रेल्वेने केली आहे. तर १ ते १४ जानेवारी या कालावधीत तब्बल ४७ प्रवासी आजारी पडले आहेत. सर्दी, ताप, खोकला, प्रवासात जखमी झालेले प्रवासी अशा रुग्णांची संख्या यात अधिक आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर मध्य रेल्वे नागपूर विभागातील रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या आजारी प्रवाशांवर उपचार करून त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना केले आहे. थंडीचा जोर संपेपर्यंत रेल्वेगाड्यातील रुग्णांची ही संख्या अशीच कायम राहणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.असा होतो उपचारप्रवासात एखाद्या प्रवाशाची प्रकृती बिघडल्यास प्रवासी थेट १३८ या हेल्पलाईनवर नियंत्रण कक्षाला सूचना देतात किंवा गाडीतील टीटीईला माहिती देतात. नियंत्रण कक्षातून पुढील रेल्वेस्थानकावरील उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाला याबाबत माहिती देण्यात येते. उपस्टेशन व्यवस्थापक संबंधित रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांना रेल्वेगाडी येईपर्यंत बोलावतात. गाडी येईपर्यंत रेल्वे रुग्णालयाचे डॉक्टर संबंधीत प्लॅटफार्मवर तयार राहतात. गाडी येताच प्रवाशाची तपासणी करून त्याचेवर औषधोपचार करण्यात येतात. एखाद्या प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्यास त्याला रुग्णवाहिकेतून मेयो रुग्णालयात पोहोचविण्यात येते.सूचना मिळताच डॉक्टर पोहोचतात‘प्रवासात एखाद्या प्रवाशाची प्रकृती बिघडल्यास ते १३८ हेल्पलाईनवर सूचना देऊ शकतात किंवा गाडीतील टीटीईला सांगू शकतात. नियंत्रण कक्षातून उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाला सूचना मिळताच संबंधित गाडी येईपर्यंत रेल्वे रुग्णालयाचे डॉक्टर रुग्णाच्या उपचारासाठी पोहोचतात.’एस.जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
रेल्वेगाड्यांमध्ये वाढलेत ‘डॉक्टर कॉल’ : सव्वा महिन्यात १३४ प्रवासी आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:01 PM
थंडीचा जोर वाढलेला असता धुक्यामुळे रेल्वेगाड्याही २ ते १५ तास उशिराने धावत आहेत. वातावरणाच्या या बदलाचा फटका रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत असून १ डिसेंबर ते १४ जानेवारी या कालावधीत तब्बल १३४ प्रवासी प्रवासादरम्यान आजारी पडल्याने त्यांच्यावर रेल्वे रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार केले आहेत.
ठळक मुद्देरेल्वेस्थानकावरच झाला उपचार