डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस
१ जुलै हा डॉक्टर देत असलेल्या आरोग्य सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. जगात दीड वर्षांपासून कोरोनाची महासाथ असल्यामुळे आजच्या डॉक्टर दिनाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय, सामाजिक आणि सर्व क्षेत्रातून डॉक्टरांप्रति टि्वट केले जात आहे. तसा डॉक्टरांचा कुठला असा एक दिवस असू नये. कारण डॉक्टर्स नेहमीच देवासमान आहेत. कोविडसारख्या कठीण प्रसंगात डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस, मीडिया प्रतिनिधी यांनी जे कर्तव्य बजावलेय, ते अतुलनीय आहे. राज्यात एक लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे श्रेय डॉक्टरांना आहे.
डॉक्टरांची आवश्यकता पूर्वीपेक्षा जास्त
असे म्हणतात की, ‘ए फिजिशियन इज द सेकंड गॉड’. साथीच्या आजाराची स्थिती पाहता डॉक्टरांची आवश्यकता पूर्वीपेक्षा जास्त आहे. हा दिवस डॉक्टरांना स्थान आणि त्यांच्या योगदानाची आठवण करून देणारा आहे. लोक त्यांच्या संपर्काच्या सूचीच्या डॉक्टरांना शुभेच्छा, संदेश, प्रतिमा आणि अभिवादन पाठवून या दिवसाचा आनंद घेतात. मागील दीड वर्ष कोरोना संकटाशी लढताना डॉक्टरांच्या योगदानाचे, त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे प्रकर्षाने साऱ्यांना महत्त्व पटले आहे. त्यामुळे या डॉक्टर्स डे च्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रात आपल्या सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या प्रत्येकाला सलाम करीत त्यांच्या कार्याप्रती धन्यवाद म्हटले जाते. जगभरात डॉक्टर्स डे साजरा करण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत; पण भारतामध्ये हा डॉक्टर्स डे १ जुलै म्हणजे उद्याच साजरा होणार असल्याने सध्या आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना जीवनदान देण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला राष्ट्रीय डॉक्टर डेचे औचित्य साधत एकदा थॅक्स म्हणायला विसरू नका.