82 जणांचे रक्तदान
आयएमए, सावनेरच्या शिबिराला विशेष प्रतिसाद
सावनेर : लोकमत वृत्तपत्र समूह आणि आय.एम.ए.च्या सावनेर शाखेच्या वतीने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेअंतर्गत रविवारी सावनेर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात सावनेर शहरातील डाॅक्टर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी स्मिता काळे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमी ऑफ पेट्रियोटिक शाखा नागपूरचे अध्यक्ष डॉ. विजय धोटे होते. कार्यक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर प्रवीण चव्हाण आणि डॉक्टर प्राची भगत होत्या.
‘लोकमत रक्ताचं नातं’ ही मोहीम राज्यभरात रक्तदानाची मोठी साखळी उभारेल. यातून गरजवंताला रक्त मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी याप्रसंगी व्यक्त केला. ग्रामीण भागातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विजय धोटे, डॉ. अनुज जैन यांचा मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरात जीवन ज्योती ब्लड बँक, नागपूरच्या चमूने रक्तसंकलनाचे कार्य केले. याप्रसंगी आय. एम.ए.च्या सावनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. नीलेश कुंभारे, सचिव डॉ. परेश झोपे, डॉ. विजय घटे, डॉ. चंद्रकांत मानकर, डॉ. प्राची भगत, डॉ.स्मिता भुढे, डॉ. विनोद बोकडे, डॉ. आशिष चांडक, डॉ. रेणुका चांडक, डॉ.अमित बाहेती, डॉ. ज्योत्स्ना धोटे, डॉ. अशोक जैस्वाल, डॉ. संगीता जैन, डॉ.अनूज जैन, डॉ. सोनाली कुंभारे, डॉ. पंकज मानकर, डॉ. विलास मानकर, डॉ. शिवम पुण्यानी, डॉ. नितीन पोटोडे, डॉ. मोनाली पोटोडे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. बाबा टेकाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. रक्तदात्यांना याप्रसंगी लोकमतच्या वतीने प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. उमेश जीवतोडे यांनी केले. आभार डॉ. आशिष चांडक यांनी मानले.