शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

डॉक्टरांच्या प्रकरणाचे ‘आॅपरेशन’ होईना

By admin | Published: March 22, 2016 2:42 AM

पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी केलेली फसवणूक तसेच छळाची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांना किती दिवस लागावेत...?

नरेश डोंगरे ल्ल नागपूर पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी केलेली फसवणूक तसेच छळाची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांना किती दिवस लागावेत...? चार दिवस, आठवडा, महिना...? छे... आठ महिने झालेत. मात्र अद्याप संबंधित व्यक्तीची तक्रार नोंदवून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे, तक्रारकर्ते कुणी सर्वसामान्य, निरक्षर नाहीत. वैद्यकीय व्यवसाय करणारे प्रतिष्ठित आहेत. तरीसुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी या प्रकरणाचे केसपेपर या पोलीस ठण्याच्या टेबलवरून त्या ठाण्याच्या टेबलवर पाठवले जात आहेत. पोलिसांच्या टाळाटाळीचे हे अफलातून उदाहरण कमालीचे संतापजनक आहे. लब्धप्रतिष्ठित आणि मितभाषी घराण्यातील तरुणाचे लग्न २००४ मध्ये झाले. हे लग्न होण्यापूर्वी लग्नाचा प्रस्ताव घेऊन येणाऱ्या वधूच्या नातेवाईकांनी मुलीचे आधीसुद्धा लग्न झाले होते, ती माहिती लपवून ठेवली. तिला एक वेगळा आजार आहे अन् आणखीही बरेच काही आहे, त्याचीसुद्धा माहिती दिली नाही. लग्न झाल्यानंतर महिनाभरातच ‘जुने प्रकरण’ लक्षात आल्यामुळे ‘डॉक्टर’ने तिची समजूत काढली. झाले गेले विसरून जा, असा सल्लाही दिला. तेवढ्यापुरता होकार दिल्यानंतर पुन्हा दोन-चार महिन्यानंतर तसेच सुरू झाले.मुख्यमंत्र्यांचेही आदेश दुर्लक्षित४तक्रारकर्त्याला पोलीस ठाण्यांचे उंबरठे झिजवावे लागू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात सर्वसामान्यांच्या हिताचा आदेश जारी केला. त्यानुसार, कुठेही गुन्हा घडो, तक्रारदाराने दिलेली तक्रार पोलिसांनी दाखल करावी अन् नंतर हे प्रकरण चौकशीसाठी संबंधित ठाण्यात पाठवावे, असे या आदेशात सुचविण्यात आले होते. वृत्तपत्रातून तशा बातम्याही प्रकाशित झाल्या. मात्र, राज्याच्या गृहविभागाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेशही दुर्लक्षित झाल्याचे या प्रकरणातून दिसत आहे.