शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

गरिबांची सेवा हेच डॉक्टरांचे समाधान : राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 9:38 PM

गरीब, दु:खितांचे दु:खहरण हेच डॉक्टरांचे समाधान असते व तोच सर्वात मोठा पुरस्कार असतो, असे मत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’चे थाटात वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते विश्वासाचे असून, या श्रद्धेला तडा जाऊ नये. पण समाजातील काही डॉक्टर्स रुग्णांकडून अवाजवी शुल्क घेतात, अशी अनेकदा ओरड होताना दिसते. परंतु अत्याधुनिक तंत्र व यंत्र यासाठी त्यांनादेखील खर्च करावाच लागतो. त्यामुळे डॉक्टरांनी पैसे कमविणे यात गैर काहीच नाही. असे करीत असताना त्यांनी सामाजिक भान जपत समाजातील गरीब रुग्णांनादेखील मदत केली पाहिजे. गरीब, दु:खितांचे दु:खहरण हेच डॉक्टरांचे समाधान असते व तोच सर्वात मोठा पुरस्कार असतो, असे मत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’चे सोमवारी नागपुरात थाटात वितरण झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. ‘मेडिसीन’ आणि ‘हेल्थकेअर’ क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे डॉक्टर्स आणि मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

स्थानिक ‘हॉटेल सेंटर पॉईंट’ येथे झालेल्या समारंभाला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि पुणे येथील संचेती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष व मुख्यऑर्थोपेडिक सर्जन डॉ. के.एच. संचेती प्रमुख अतिथी आणि मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी अतिथी म्हणून ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, ‘एसबीएस बायोटेक’, चंदीगडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव जुनेजा उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर ‘लोकमत’च्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, पुरस्कार निर्णायक मंडळाचे अध्यक्ष डॉ.एस.एन.देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. 
आधुनिक काळात वैद्यकीय क्षेत्रात दररोज नवनवे शोध लागत आहेत. भविष्याचा वेध घेऊन डॉक्टरांनी तर चंद्रावर कशाप्रकारे उपचार होतील, याबाबत विचार केला पाहिजे. डॉक्टरांना अनेक पुरस्कार मिळतात. परंतु गरिबांच्या सेवेतून मिळणारी आत्मिक शांती हा सर्वात मोठा पुरस्कार असतो. डॉक्टरांनी ग्रामीण भागाचीदेखील चिंता केली पाहिजे, असे राज्यपाल म्हणाले. नागपूरच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीतून डॉक्टरांनी संकल्प घ्यावा व गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेत एक नवा इतिहास रचावा. डॉक्टर या विचारांवर चालले तर खऱ्या अर्थाने हे पुरस्कारदेखील इतिहास घडविणारे ठरतील, असे प्रतिपादनही राज्यपालांनी यावेळी केले. या समारंभाचे संचालन श्वेता शेलगांवकर यांनी तर पुरस्कार निर्णायक मंडळाचे सचिव डॉ.राजू खंडेलवाल यांनी आभार मानले.दर्डा हे खरोखर ‘विजयस्तंभ’चयावेळी राज्यपालांनी विजय दर्डा यांच्याबाबत कौतुकोद्गार काढले. विजय दर्डा माझ्यासोबत राज्यसभेत होते. त्यांनी सर्वच क्षेत्रात जीवाभावाची माणसे जोडली आहेत. त्यांचा करिष्मा सगळीकडेच दिसून येतो. अगदी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातदेखील ‘लोकमत’च दिसून येतो. खरोखर दर्डा हे ‘विजयस्तंभ’च आहेत. त्यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असून, त्यांचा शब्द माझ्यासाठी जणू आदेशच असतो. त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेले ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्’ नवा इतिहास रचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सरकारी इस्पितळांची योग्य देखभाल व्हावी : दर्डा
यावेळी विजय दर्डा यांनी पुरस्कारांमागची भूमिका मांडली. मध्य भारतातील ‘मेडिकल हब’ म्हणून नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. शहराला हे स्थान मिळवून देण्यात येथील डॉक्टरांचा मोलाचा वाटा आहे व त्यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे, या भावनेतून पुरस्कारांची कल्पना समोर आली. आरोग्य क्षेत्रात अद्यापही बरेच कार्य करणे बाकी आहे. गावांमध्ये अनेक समस्या आहेत. सरकारी इस्पितळांची अवस्था वाईट असून, जागोजागी अस्वच्छता व असुविधा दिसून येते. यंत्र असतात पण चालत नाहीत. आजारांचे माहेरघरच झाल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे या इस्पितळांच्या देखभालीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हे काम काढून इतर संस्थेला दिले पाहिजे. यासाठी राज्यपालांनी सरकारला निर्देश द्यावे, असे विजय दर्डा म्हणाले.पारदर्शक पुरस्कार : एस.एन.देशमुख‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’चे विजेते निवडणे हे पुरस्कार निर्णायक मंडळासमोर मोठे आव्हानच होते. या प्रक्रियेत संपूर्णत: पारदर्शकता ठेवण्यात आली होती. ५० टक्के गुण निर्णायक मंडळ व ५० टक्के गुण जनतेच्या मतांवर आधारित होते व त्यानुसार विजेते निवडण्यात आले, असे पुरस्कार निर्णायक मंडळाचे अध्यक्ष डॉ.एस.एन.देशमुख यांनी सांगितले.‘लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड्स’

डॉ.बी.जे.सुभेदार, नागपूरडॉ.शोभा ग्रोव्हर, नागपूर‘आऊटस्टॅन्डिंग कॉन्ट्रिब्युशन पुरस्कार’

डॉ.सुधीर बाभुळकर, नागपूरडॉ.मदन कापरे, नागपूरडॉ.श्रीकांत मुकेवार, नागपूरडॉ.जय देशमुख, नागपूरडॉ.देबाशिष चॅटर्जी, गोंदियापुरस्कार श्रेणी              डॉक्टर मेडिसिन व संबंधित        डॉ.अशोक बावस्कर, खामगावसर्जरी व संबंधित            डॉ.चंद्रशेखर बांडे ,नागपूरप्रसूती व स्त्रीरोग             डॉ.स्नेहा भुयार, यवतमाळनेत्ररोग                           डॉ.जुगल चिरानिया, अकोलाबालरोग                         डॉ.नरेंद्र राठी, अकोलासुपर स्पेशलिटी (मेडिसीन) डॉ.प्रमोद मुंदडा, नागपूरसुपर स्पेशलिटी (सर्जरी) डॉ.क्षितिज पाटील, अमरावतीफॅमिली फिजिशियन डॉ.अशोक वासलवार, चंद्रपूररेडिओलॉजी/ पॅथालॉजी डॉ.सुधीर नेरळ, नागपूररुग्णालय (हॉस्पिटल) ओझोन हॉस्पिटल, अकोला

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीLokmat Eventलोकमत इव्हेंट