लोकमत इम्पॅक्ट
नागपूर : ‘लोकमत’ने ‘निविदेच्या कागदपत्रांच्या नावावर वसुली’ असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आपली चूक दुरुस्त केली आहे. आता रेल्वेतील कंत्राटासाठी कंत्राटदारांकडून निविदा कागदपत्रांचे शुल्क घेण्यात येणार नसल्याची माहिती मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय अभियंता पवन पाटील यांनी सांगितले की, निविदा कागदपत्रांचे शुल्क न घेण्याबाबतचा मॅसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत होता. त्याला खरे मानण्यात येऊ शकत नव्हते. अशा स्थितीत कंत्राटदारांकडून आतापर्यंत झालेल्या निविदांसाठी निविदा कागदपत्रांचे शुल्क घेण्यात आले. याबाबत झोन मुख्यालयाकडून स्पष्टीकरण मागितल्यानंतर निविदा कागदपत्रांचे शुल्क न घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती समजली. त्या आधारे आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे देण्यात येणाऱ्या कंत्राटासाठी निविदा कागदपत्रांचे शुल्क आकारण्यात येणार नाही. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला सोडून इतर विभागात निविदा कागदपत्रांचे शुल्क घेण्यात येत नसल्याचे वृत्त लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर रेल्वेने आपली चूक दुरुस्त केली असून आता कंत्राटदारांकडून निविदा कागदपत्रांचे शुल्क वसूल करण्यात येणार नाही.
.................