भाजपला भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे का ? नाना पटोले यांचा थेट सवाल

By कमलेश वानखेडे | Published: July 29, 2023 03:53 PM2023-07-29T15:53:02+5:302023-07-29T15:56:58+5:30

भिडेंना तातडीने अटक करा, नाही तर पुन्हा विधिमंडळात हा प्रश्न उचलू

Does BJP want to make Manipur of Maharashtra using Sambhaji Bhide? Direct question from Nana Patole | भाजपला भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे का ? नाना पटोले यांचा थेट सवाल

भाजपला भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे का ? नाना पटोले यांचा थेट सवाल

googlenewsNext

नागपूर : संभाजी भिडे हे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधान करीत आहेत. भीमा कोरेगाव घटना घडली त्यासाठी भिडे जबाबदार होते. भिडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी आधीच विधिमंडळात केली आहे. दोन तीन दिवसात अटक केली नाही तर पुन्हा विधिमंडळात हा प्रश्न उचलू, असा इशारा देत भाजपला भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे का, असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी शनिवारी नागपुरात केला.

पटोले म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक लिहिणाऱ्या जाहीर फाशी देण्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले. आता फडणवीस भिडे यांना जाहीर फाशी देतील का? महाराष्ट्रातील लोकं संयम ठेवून आहे. त्यांची परीक्षा घेऊ नका. संयम सुटला तर लोकं यांना पळता भुई थोडे करतील, असा इशाराही पटोले यांनी दिला. काँग्रेस पक्ष भाजप विरोधात लढा देत आहे. इतर पक्षांनी (शरद पवार) काय करावे हे त्यांनी ठरवावे. आमचे धोरण स्पष्ट आहे की भाजप विरोधात लढताना जे आमच्या सोबत येतील त्यांनी यावे, असेही त्यांनी सांगितले.

तेंलगणातील धरणामुळे महाराष्ट्रात पूर

 चंद्रपूर येथे गेल्या दोन वर्षात पूररेषा ओलांडून घरे बांधण्यात आलेली नाहीत. तेलंगणा मध्ये बांधलेल्या धरणामुळे सर्व समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीला फुग येते. भाजप सत्तेत असताना नियम डावलून तेलंगणाने धरण बांधले चायाच फटका आता महाराष्ट्राला बसत असल्याचेही पटोले म्हणाले.

गुजरातमधील लोकांनी नानारमध्ये जमिनी घेतल्या

- भाजपशी संबंधित असलेल्या गुजरातमधील लोकांनी नानार येथे जमिनी घेतल्या आहेत. जेव्हा यादी समोर येईल तेव्हा धक्का बसेल. हे सर्व जमिनीच्या मोबदल्यासाठी होत आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे हे प्रकार आहेत. नाणार मध्ये जमीन घेणाऱ्यांची नावे सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ठाणे, नागपुरात लोक सुरक्षित नाही

- महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था योग्य नाही. फक्त मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातही लोक सुरक्षित नाहीत. नागपुरात तर एका दिवसात चार लोकांची हत्या होत आहे. हे चित्र भयावह असल्याची टीका पटोले यांनी केली.

Web Title: Does BJP want to make Manipur of Maharashtra using Sambhaji Bhide? Direct question from Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.