शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

ख्रिश्चन व्यक्तीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:46 AM

हिंदू दत्तकविधान कायद्यानुसार ख्रिश्चन व्यक्तीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही, हा महत्त्वपूर्ण प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात प्रकरणदपूम रेल्वेने नाकारली मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू दत्तकविधान कायद्यानुसार ख्रिश्चन व्यक्तीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही, हा महत्त्वपूर्ण प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. या प्रकरणावरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये २६ नोव्हेंबर २००७ पासून कार्यरत असलेल्या प्रेसिल्ला अ‍ॅन्थोनी जोसेफ यांनी सख्ख्या पुतणीला दत्तक घेतल्याचे सांगून, तिचे नाव रेकॉर्डवर नोंदवून घेण्याची विनंती केली होती. यासंदर्भात त्यांनी ६ डिसेंबर २०१० रोजी अर्ज सादर केला होता. रेल्वेने ९ सप्टेंबर २०११ रोजी तो अर्ज फेटाळून लावला. हिंदू दत्तकविधान कायद्यामध्ये ख्रिश्चन व्यक्तीने मूल दत्तक घेण्याविषयी तरतूद नसल्याचे कारण अर्ज फेटाळताना देण्यात आले. त्यामुळे प्रेसिल्ला यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली. ४ जून २०१८ रोजी न्यायाधिकरणने रेल्वेचा निर्णय कायम ठेवून प्रेसिल्ला यांचा अर्ज खारीज केला, तसेच त्यांच्यावर २५ हजार रुपये दावा खर्च बसवला. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने प्रकरण ऐकल्यानंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी यांना नोटीस बजावली. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. एच. आय. कोठारी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय