लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी मध्यरात्री कुत्र्यांनी एका चितळाची शिकार केल्याची घटना गोरेवाडा नॅशनल पार्कजवळील जुना नाक्याजवळ घडली. घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी मृतावस्थेतील चितळ ताब्यात घेतले.शहरापासून थोड्या अंतरावर गोरेवाडा रेस्क्यू सेंटर आहे. येथे अनेक वन्यप्राणी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय दूरपर्यंत जंगल पसरले आहे. तेथून जवळच गोरेवाडा वस्ती आहे. या वस्तीच्या आजूबाजूला जंगल असल्यामुळे वन्यप्राणी नेहमीच या गावात आढळतात. मध्यरात्री अचानक कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आल्यामुळे दिनेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने घराबाहेर येऊन पाहिले असता काही कुत्रे चितळाच्या मागे लागलेले दिसले. ते चितळाचा चावा घेत होते. चितळाला वाचविण्यासाठी त्यांनी कुत्र्यांना दगड मारून पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु जवळपास १० ते १२ कुत्रे चितळाच्या मागे लागल्यामुळे ते चितळाच्या मागे पळाले. सकाळी सतीश दहिया नावाच्या व्यक्तीच्या घराजवळ चितळ मृतावस्थेत आढळले. घटनास्थळी नागरिक गोळा झाले. त्यांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी सकाळी ८ वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून चितळाला ताब्यात घेतले. सेमिनरी हिल्स येथील रेस्क्यू सेंटरमध्ये या चितळाचे शवविच्छेदन करून सेमिनरी हिल्सच्या जंगल परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी विजय गंगावने यांनी दिली.
कुत्र्यांनी केली चितळाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:14 PM
शनिवारी मध्यरात्री कुत्र्यांनी एका चितळाची शिकार केल्याची घटना गोरेवाडा नॅशनल पार्कजवळील जुना नाक्याजवळ घडली. घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी मृतावस्थेतील चितळ ताब्यात घेतले.
ठळक मुद्देगोरेवाडा परिसरातील मध्यरात्रीची घटना