लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची डॉक्टर आणि त्यांच्या चमूतर्फे आधुनिक उपकरणांद्वारे तपासणी करण्यात येत आहे, पण घरगुती प्रवाशांची तपासणी करण्यात येत नसल्याची बाब पुढे आली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्यानंतरही प्रवाशांची तपासणी करण्यात येत नसल्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.विदेशातून मुंबई आणि दिल्ली येथे आलेल्या प्रवाशांची त्या त्या विमानतळावर वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. पण हेच प्रवासी विमानाने नागपुरात येतात तेव्हा त्यांची तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळे नागपुरात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागपुरात दोहा आणि शारजाह येथून दोन आंतरराष्ट्रीय विमाने नागपुरात येतात. या सर्व प्रवाशांची डॉक्टरांतर्फे अद्ययावत उपकरणांद्वारे तपासणी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता विदेशातून केवळ भारतीय प्रवासी येत आहेत. आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.विमानतळ प्रशासनाला ५ मार्चच्या रात्री केंद्रीय मंत्रालयाकडून आदेश आल्यानंतर त्वरित विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) विमानतळावर हेल्प डेस्क स्थापन केला आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे दोन डॉक्टर, दोन पॅरामेडिकल स्टॉफ, नर्स आणि एमआयएलचे अधिकारी तैनात आहेत. त्यांच्यातर्फे प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. संशयित प्रवाशाला बाहेर काढून त्याला पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचे अधिकारी म्हणाले.घरगुती प्रवाशांना तपासणीचे आदेश नाहीतसध्या केंद्रीय मंत्रालयाकडून विमानतळावर घरगुती प्रवाशांच्या तपासणीचे आदेश नाहीत. पण आदेश आल्यास आम्ही तपासणी करू. देशातील अन्य विमानतळावर आदेश आल्यास आम्हालाही येतील. विमानतळावर सर्व यंत्रणा सज्ज आहे. आम्ही मंत्रालयातील अधिकाºयांच्या निरंतर संपर्कात आहोत. सध्या कतार एअरलाईन्सने २० ते २५ आणि एअर अरेबिया एअरलाईन्सने जवळपास ८० प्रवासी येत आहेत. सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. एम. ए. आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल.
नागपूर विमानतळावर घरगुती प्रवाशांची तपासणीच नाही : विमानतळावर यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 8:38 PM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची डॉक्टर आणि त्यांच्या चमूतर्फे आधुनिक उपकरणांद्वारे तपासणी करण्यात येत आहे, पण घरगुती प्रवाशांची तपासणी करण्यात येत नसल्याची बाब पुढे आली आहे.
ठळक मुद्देमंत्रालयाकडून आदेश नाहीत