शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

घाबरू नका, पण काळजी घ्या: माजी मुख्यमंत्र्यांनी रुग्णांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:16 AM

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) भेट देऊन व्हिडीओ कॉलिंगद्वारे कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णाच्य प्रकृतीची आस्थेने चौकशी केली, घाबरू नका पण काळजी घ्या, डॉक्टर सांगतील तसे वागा, अस सल्लाही दिला.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) भेट देऊन व्हिडीओ कॉलिंगद्वारे कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णाच्य प्रकृतीची आस्थेने चौकशी केली, घाबरू नका पण काळजी घ्या, डॉक्टर सांगतील तसे वागा, अस सल्लाही दिला. फडणवीस यांनी पुढील दोन दिवसात रुग्णसेवेत सुरू होणाऱ्या अतिदक्षता विभागाची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. सोबतच डॉक्टरांच्या कार्याचे कौतुकही केले.फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी १.३०वाजता मेडिकलला भेट दिली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या कक्षात त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. तीन वर्षांपूवी त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ट्रॉमा केअर सेंटर म्हणजे आताचे कोविड हॉस्पिटलमधून दिल्या जाणाºया सेवेची माहिती घेतली. येथील रुग्णसेवेच्या नियोजनावर त्यांनी समाधान व्यक्त केले. याच दरम्यान त्यांनी कोविड हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांशी मोबाईलच्या मदतीने व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधला. कसे आहात, काही समस्या आहे का, असे प्रश्न विचारून काळजी घेण्याचे व डॉक्टरांनी सांगितल्यानुसार वागण्याचा सल्लाही दिला. लहान मुलगा, पुरुष व एका रुग्ण महिलेशी संवाद साधला. यानंतर फडणवीस यांनी तकिया जिमखाना आणि जयताळ्यातील एकात्मतानगर येथे सुरू करण्यात आलेल्या कम्युनिटी किचनलाही भेट देऊन पाहणी केली. या दोन्ही ठिकाणी सुमारे दीड महिन्यापासून दररोज दोन हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे. यावेळी आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, किशोर वानखेडे, पारेंद्र पटले, लखन येरावार, आशिष पाठक उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या