शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
2
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
3
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
4
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
5
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
6
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
7
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
8
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
9
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
10
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
11
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
12
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
13
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
14
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
15
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
16
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
17
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
18
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ
19
बॉबी देओलने खरेदी केली शानदार रेंज रोव्हर SUV, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या
20
“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

यूपीचे द्वेषाचे राजकरण महाराष्ट्रात आणू नका; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला

By कमलेश वानखेडे | Updated: March 25, 2025 17:06 IST

Nagpur : महालातील शिवाजी पुतळा चौकासह दंगलग्रस्त भागात दिली भेट

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर दंगलीतील आरोपी युसूफ खान याच्या घरावर महापालिकेने बुलडोजर चालविला. यावर काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचे सदस्य व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी यूपीचे द्वेषाचे राजकरण महाराष्ट्रात आणू नका, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. बांधकाम अनधिकृत असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या नियमात राहून कारवाई करावी. पण ती विशिष्ट सामाजासाठी राहू नये, असे सांगत मुंबइत अनेक अनधिकृत बिल्डिंग आहे तिथे बुलडोझर चालवणार आहे का, असा सवालही दलवाई यांनी केला.

हुसेन दलवाई यांनी मंगळवारी महाल, शिवाजी पुतळा चौक, भालदारपुरा यासह दंगलग्रस्त भागात भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, युसूफ खान चे घर पाडले यात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळले नाही. बुलडोजर यूपीत ठीक आहे. पण हा शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांना जवळ केले. इथली परंपरा जातीयवादी नाही, तर एकोप्याची आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे दंगे होतात त्या ठिकाणी मी जात असतो. भेट देऊन दोन्ही समाजात भाईचारा राहावा, शांतता राखावी यासाठी प्रयत्न करतो. नागपुरात आल्यावर सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसह अनेक लोकांना, पत्रकारांना भेटलो. महाराष्ट्रात अशा पद्धतीचे वातावरण कधीही नव्हते. महाराष्ट्रात नेहमीच दोन्ही धर्माचे एकोप्याचे नाते राहिलेले आहे. अनेक सणांमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येतात. गुढीपाडवा, राम नवमी शांततेत होईल याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दंगलग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान दलवाई यांच्यासोबत काँग्रेस पदाधिकारी दिनेश बानाबाकोडे, नॅश अली, प्रकाश सोनवने, ॲड. अभय रणदिवे, हाफीज पटाण, फिरोज खान, मोईन अली आदी उपस्थित होते.

मुस्लिम धर्मियांनी गांधींच्या मार्गाने उत्तर द्यायला हवे होतेहिरवी चादर जाळण्यात आली त्यामुळे हा दंगा भडकला. अशा पद्धतीच्या आंदोलनात पोलीस हस्तक्षेप करतात, जाळायला कधीही परवानगी देत नाही. यात चादर जाळायला परवानगी कशी दिली. सकाळी ज्यांनी आंदोलन केले त्यांच्यावर कारवाई नाही. ज्यांनी रात्री आंदोलन केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. सरकार जाणीवपूर्वक काही लोकांना मदत करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुस्लिम धर्मियांनी सुद्धा महात्मा गांधींच्या शांततेच्या मार्गाने त्याला उत्तर देऊ शकले असते, असेही दलवाई म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालयHussein Dalwaiहुसेन दलवाई