शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

गर्दी करू नका, अन्यथा कठोर निर्णय : महापौर संदीप जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 8:30 PM

गर्दी करू नका, अफवा पसरवू नका आणि काळजी घ्या, असे आवाहन करतानाच तसे नाही केले तर जनहितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देआवाहन अन् इशाराही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र आणि राज्य शासन तसेच स्थानिक यंत्रणांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केल्याने जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात आज तिसऱ्या आठवड्यात कोरोना संसर्ग व्यक्तींची संख्या तुलनेने फार कमी आहे. मात्र, पुढील काही आठवडे काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक यंत्रणेने आदेश काढलेले आहेत. यामध्ये लोकांचे सहकार्य गरजेचे आहे. गर्दी करू नका, अफवा पसरवू नका आणि काळजी घ्या, असे आवाहन करतानाच तसे नाही केले तर जनहितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही महापौरसंदीप जोशी यांनी दिला आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणेतर्फे आजवर केलेली कार्यवाही आणि करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात संदीप जोशी यांनी मनपा मुख्यालयात बुधवारी आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी कोरोनासंदर्भात नागपूरशी संबंधित माहिती दिली.मनपाचा नियंत्रण सज्जकोरोनासंदर्भात अथवा संशयिताबद्दलची माहिती देण्यासाठी महापालिकेने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. दूरध्वनी क्रमांक ०७१२-२२५६७०२१ असून नागरिकांनी कोरोना बाधितासंदर्भात कुठलीही माहिती नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.आयएमएची हेल्पलाईनआय.एम.ए.ने सुद्धा जनतेला कोरोनाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी २४ तास हेल्पलाईन सुरू केली आहे. यावरून थेट डॉक्टरांशी संवाद साधता येतो. नागरिकांनी आय.एम.ए.च्या भ्रमणध्वनी क्रमांक ९९९९६७२२३८ आणि ९९९९६७२२३९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आय.एम.ए.तर्फे करण्यात आले आहे.मास्कची योग्य विल्हेवाट लावानागरिकांनी भयभीत होऊन मास्कचा वापर करु नये. वापरले तर ते योग्य प्रकारे कागदात गुंडाळून मनपाच्या स्वच्छतादूताकडे अर्थात कचरागाड्यांमध्ये द्यावे. त्यात स्वतंत्रपणे ते ठेवण्यात येईल व योग्य विल्हेवाट लावली जाईल, असे आवाहनही महापौरांनी केले.बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

  • चार कोरोना बाधितांच्या संपर्कातील ८३ जणांवर आरोग्य यंत्रणेची नजर.
  • विदेशातून येणाऱ्यांसाठी आमदार निवास येथे २४० खाटांची व्यवस्था.
  • आमदार निवासात ठेवण्यात आलेल्यांना सर्व सुविधा उपलब्ध.
  • रोग प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना संसर्ग होण्याची शक्यता.
  • जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक खबरदारी
  • वेळ पडल्यास सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात येतील.
  • अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होणार.
  • सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ तातडीने रद्द करण्याचे आवाहन.
टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीMayorमहापौरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या