वसीम कुरैशी
नागपूर : पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणी, लॉकडाऊनचा परिणाम यामुळे मार्च महिन्यात रेशन दुकानदारांना वेळेत रेशन वाटता आले नाही. त्यामुळे मार्च महिन्याचे रेशनचे वितरण ४ एप्रिलपर्यंत करावे लागणार आहे. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाने शासनाकडे मागणी केली की एप्रिल महिन्याचे धान्य लवकरात लवकर पाठवू नये.
१७ मार्च रोजी पॉस मशीनमध्ये डाटा अपलोड करण्यात आला. होळीपर्यंत दुकाने फार कमी वेळेसाठी उघडली. याच दरम्यान कार्डधारकांकडून फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी रेशन दुकानदारांवर होती. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
डाटा वेळेवर अपलोड का नाही केला?
कोरोना संक्रमणामुळे धान्य वितरणाला गंभीरतेने घेणे गरजेचे आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये हजारो नागरिकांना रेशनचा लाभ झाला. त्यावेळी रेशन दुकानदारांनी उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवून धान्याचे वितरण केले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये गंभीरता दिसून आली नाही. मार्च महिन्यात मशीनमध्ये डाटाच उशिरा अपलोड करण्यात आला. याचे कारण अधिकाऱ्यांकडून मिळत नाही.
- ऑफलाईन रेशन वितरणाची परवानगी द्यावी
हिंगण्यातील एका दुकानदाराच्या मृत्यूनंतर संघटनेने शासनाकडे मागणी केली की, रेशन दुकानदारांना ऑफलाईन रेशन वितरणाची परवानगी द्यावी. मशीनमुळे संक्रमणाचा धोका होत असतो. कुठल्या कार्डधारकाला रेशन मिळाले नाही तर तो तक्रार करू शकतो. दुसरीकडे रेशन दुकानदारांना फॉर्म भरण्याची जबाबदारीसुद्धा दिली आहे. रेशनच्या वितरणात व्यस्त असलेल्या दुकानदारांना फॉर्म भरून घेणे अवघड जात आहे. त्यामुळे संघटनेने शासनाला मागणी केली की, ही जबाबदारी रेशन दुकानदारांकडून काढून घ्यावी.
गुड्डू अग्रवाल, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघ