नागपूर : धापेडावा सारख्या एका छोट्या गावात काही महिलांनी एकत्र येत बतच गट स्थापन केला. सुरुवातीला लोणचे, पापड विक्री सुरू केली. नंतर त्यांच्यात असलेल्या कौशल्याचा वापर करून कपडे शिवणे सुरू केले. त्या शर्ट शिवून, त्याची पॅकिंग करून विक्री करू लागल्या. त्यांंना सरकारच्या महिला सशक्तीकरण प्रकल्प `उमेद’ची साथ मिळली अन बाजारात विक्रीसाठी धडपड करणाऱ्या या महिलांना ऑनलाईन विक्रीचा मार्ग दाखविण्यात आला. आज या ग्रामीण भागातील महिला प्रसिद्ध शॉपिंग साईटवर आपले शर्ट विकत असून
अमेरिकेपर्यंत प्रवासाची संधी त्यांच्यापर्यंत चालून आली. ‘उमेद’ या नावाने त्यांनी शर्टची ब्रॅण्डींग केले आहे. अॅमेझॉनवर लवकरच धापेवाड्यातील हे शर्ट उपलब्ध होणार आहे.
शिवण्याचा अनुभव होता. त्यातून शर्ट शिवण्याचा प्रयत्न केला. प्रदर्शनामध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. महिला पुरुषांचे वस्त्र शिवतात, हे बघून अनेकांनी दाद दिली. त्यामुळे दोन पैसे अधिक हाती पडले. महिलांचा आत्मविश्वास वाढला. त्यातूनच ही वाटचाल सुरू आहे.
महिला सशक्तीकरण प्रकल्पाचेच उमेद हे नाव आपल्या ब्रँडला दिले आहे.
महिला कुठेही कमी नाहीत, याचा पदोपदी आपल्याला अनुभव येतोच. आता महिलांनी पुरुष पेहराव्याच्या क्षेत्रातही वाटचाल केली आहे. त्या ग्रामीण भागातील महिला असल्याने औत्सुक्याचा विषय ठरत आहे. कुठल्याही अनुभवाशिवाय पुरुषांच्या क्षेत्रात या महिलांनी केलेली वाटचाल आणि त्याची मुंबई, दिल्लीत पडलेली छाप वाखाणण्याजोगी आहे. या महिला पुरुषांचे शर्ट बनवित आहे.
कळमेश्वर तालुक्यातील धापेवाड्यातील गुरुमाऊली स्वयंसाहायता बचत गटाने घेतलेली भरारी अॅमेझॉनपर्यंत पोहचली आहे. माला कोहाड यांनी २००८ मध्ये बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीला लोणची, पापडांचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाला नाही. त्यामुळे पिशवी शिवायला सुरुवात केली. गटातील सर्व महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले. पण त्यातून त्यांच्या श्रमाला समाधानकारक मोबादला मिळाला नाही. पुरुष मंडळी स्त्रियांचे वस्त्र शिवतात. पण स्त्री शिवणकाम करताना पुरुषांचे वस्त्र शिवत नाही. शिवणकाम करणारी स्त्री पुरुषांचेही वस्त्र शिवू शकते, त्यातून गटाचे वेगळेपण समोर येऊ शकते. या भावनेतून या गटाने पुरुषांचे शर्ट शिवायला सुरूवात केली. सहा वर्षापूर्वी त्यांनी हा प्रयत्न केला. एका प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या शर्टला प्रतिसादही मिळाला. हीच त्यांच्यासाठी प्रेरणा ठरली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने त्यांच्या प्रेरणेला प्रोत्साहन दिले आणि एका वेगळ्या व्यवसायाला त्यांची सुरुवात झाली.
व्यवसायाच्या वाढीसाठी आतापर्यंत या गटाने १५ लाख रुपयांचे बँकेचे कर्ज चुकते केले आहे. मुंबई, दिल्ली येथे झालेल्या प्रदर्शनांमध्ये त्यांनी आपल्या शर्टाची छाप सोडली आहे. तत्कालीन नागपूरचे विभागीय आयुक्त, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे या बचत गटाने चांगलीच भरारी घेतली. तालुका, जिल्ह्याचा पुरस्कार पटकाविला.
कोरोनाच्या काळात त्या डगमगल्या नाही
कोरोना महामारीला रोखण्यासाठी लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. पण या गटाचे काम सातत्याने सुरू होते. गटातील ११ महिलांबरोबर गावातील किमान २० महिला गटाशी शिवणकामात जुळल्या आहे. शर्टाचे कटिंग करणे, शिलाई करणे हे सर्व काम त्या स्वत: करीत असल्याने कोरोनाच्या काळात त्यांच्या हातचे काम सुटले नाही.
माला कोहाड, अध्यक्ष, गुरुमाऊली स्वयंसाहायता बचत गट