लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर शहरात १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाल्याने तरुणात उत्साह होता. मात्र मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने लागोपाठ तिसऱ्या दिवशी गुरूवारी लसीकरण केंद्र बंद राहणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांची डोससाठी भटकंती सुरू आहे.
पुरेशा प्रमाणात डोसचा पुरवठा होत नसल्याने मागील आठ दिवसात चार दिवस शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. २३ जूनला १८ वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु डोस उपलब्ध नसल्याने २५ जून, २७ जून, २९ जून व ३०जूनला रोजी लसीकरण झाले नाही. त्यात बुधवारी सायंकाळपर्यंत मनपाला डोस उपलब्ध झाले नाही. यामुळे गुरुवारी पुन्हा शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाकडून कोविशिल्डचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. यामुळे गुरुवारी लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. परंतु तीन केंद्रावर कोव्हॅक्सिन दिली जाणार आहे. यात मेडिकल कॉलेज, स्व. प्रभाकरराव दटके रोग निदान केंद्र व डॉ. बाबासाहब आंबेडकर रुग्णालयाचा समावेश आहे. कोव्हॅक्सिनसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे.
नागपूरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती (२९ जून)
पहिला डोस
आरोग्य सेवक - ४६,३०७
फ्रंटलाईन वर्कर - ५३,२९६
१८ वयोगट - १,४८,१५६
४५ वयोगट - १,५०,७४७
४५ कोमार्बिड - ८६,०४५
६० सर्व नागरिक - १,८३,९४६
पहिला डोस - एकूण - ६,६८४९७
दुसरा डोस
आरोग्य सेवक - २५३६०
फ्रंटलाईन वर्कर - २७२२८
१८ वयोगट - ७८६०
४५ वयोगट - ४६०५४
४५ कोमार्बिड - २१,६४५
६० सर्व नागरिक -८९,३४४
दुसरा डोस - एकूण - २,१३०११
संपूर्ण लसीकरण एकूण - ८,८१,५०६