नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: इतवारी रेल्वे स्थानकावर कळमना दिशेकडे बनविण्यात येत असलेल्या सब-वे करिता बॉक्स (एलएचएस) पुशिंगचे कार्य केले जाणार आहे. त्यामुळे आजपासून रेल्वे ब्लॉक करण्यात येत आहे. परिणामी मे महिन्यात वेगवेगळ्या वेळेस रेल्वे गाड्या प्रभावित होणार आहे.
तूर्त दषिण पूर्व मध्य रेल्वेने सुमारे डझनभर गाड्या नियोजित तारखांना रद्द केले आहे. उन्हाळी सुट्या आणि लग्न समारंभाच्या हंगामात प्रवाशांची गर्दी वाढत असताना करण्यात आलेला हा ब्लॉक प्रवाशांची कुचंबना करणारा ठरू शकतो.
एलएचएस पुशिंगचे काम ८ ते ३० मे पर्यंत चालणार आहे. त्यामुळे ०८७११/ ०८७१२ डोंगरगड -गोंदिया - डोंगरगड मेमू , ०८७१३, ०८७१६ गोंदिया-सुभाष चंद्र बोस (इतवारी)-गोंदिया, ०८७५१/ ०८७५६ इतवारी-रामटेक-इतवारी मेमू पॅसेंजर स्पेशल. ०८७५४/ ०८७५५ इतवारी-रामटेक-इतवारी मेमू, ०८७१४/०८७१५ इतवारी-बालाघाट-इतवारी मेमू, ०८२८१ इतवारी-तिरोडी पैसेंजर, ०८२८४/ ०८२८३ तिरोडी-तुमसर-तिरोडी पॅसेंजर ८ ते ११ मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. याद कालावधीत ०८२८२ तिरोडी- इतवारी पैसेंजर, १८१०९/१८११० टाटानगर-इतवारी-टाटानगर एक्सप्रेस, ११२०१/११२०२ नागपूर-शहाडोल- नागपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
- तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेल्या गाड्या इतवारी-रिवा एक्सप्रेस ८, १०,११, १३, १५, १७, १८, २०, २२, २४, २५, २७, २९ आणि ३१ मे रोजी रद्द राहिल.
- रिवा-इतवारी एक्सप्रेस ७, ९, १०, १२, १४, १६, १७, १९, २१, २३, २४, २६, २८ आणि ३० मे रोजी रद्द राहिल.
- ११२०१ नागपूर-शहडोल एक्सप्रेस १९ ते ३० मे पर्यंत तर, ११२०२ शहडोल-नागपूर एक्सप्रेस ही गाडी २० ते ३१ मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे.