नागपूर : नागपुरातील तरुण व्यावसायिक ॲड.संकेत रमेशराव फुके यांचे अल्पशः आजाराने ९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे निधन झाले. ते ४० वर्षांचे होते.
आमदार डॉ.परिणय फुके यांचे ते धाकटे बंधू होत. दिवंगत संकेत यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई- वडील, दोन भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे. संकेत हे राष्ट्रीय स्तरावरील टेनिस आणि जलतरणपटू म्हणून ओळखले जात होते. त्यांचा विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग होता. २००९ मध्ये संकेत यांचे किडनी निकामी झाले असताना, त्यांच्या आईने किडनी दान दिली होती.
दिवंगत संकेत फुके यांच्यावर शनिवारी दुपारी अंबाझरी दहनघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.