आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजात समता प्रस्थापित व्हावी, धर्म, जात, पंथ याचा विचार न करता एकूणच सर्व सामाजाचे कल्याण व्हावे, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. याचा उद्देश अतिशय चांगला असला तरी दोन वर्षात एकही ठोस उपक्रम प्रतिष्ठानने राबवलेला नाही. उपक्रमाच्या नावावर केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम सुरु असून त्यावर तब्बल १० कोटीवर रुपये खर्च झाले आहे. त्यामुळे प्रतिष्ठान ठाकले पण समतेच्या प्रयत्नांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची निर्मिती करण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला. १५ आॅक्टोबर २०१५ रोजी तसा शासन आदेशही जारी केला. दोन वर्षानंतर १० जुलै २०१७ रोजी या प्रतिष्ठानची निर्मिती झाली. हे प्रतिष्ठान कंपनी कायदा २०१३ च्या ८ (१) (ंए) अंतर्गत कुठलाही नफा न कमविण्याच्या तत्त्वावर स्थापन करण्यात आले आहे. नागपूरची दीक्षाभूमी ही जगला समतेचा संदेश देणारी ऊर्जाभूमी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. म्हणूनच समता प्रतिष्ठानाचे मुख्यालय हे नागपूर येथे करण्यात आले आहे. सामाजिक न्याय भवनात त्याचे मुख्यालय आहे.समाजातील सर्वच दुर्बल घटकांना तसेच शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या प्रदेशातील जनतेला उच्च दर्जाचे शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे. समताधिष्ठित मूल्यशिक्षण जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने वाचनालय, अभ्यास कक्ष, संशोधन संस्था, शैक्षणिक केंद्र इत्यादींची स्थापना करणे. समताधिष्ठित राष्ट्र निर्मितीस आवश्यक अशा सामाजिक व आर्थिक मुद्यांवर भाषणे, कार्यशाळा, चर्चासत्र आयोजित करणे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैयक्तिक कागदपत्रे व इतर ऐतिहासिक सामुग्रींचा संग्रह करणे. समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीकरिता कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था इत्यादींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आवश्यक योजना निर्माण करणे.परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाºया गरजवंत व पात्र अशा भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व संशोधनासाठी फेलोशीप, शिष्यवृत्ती जाहीर करणे, इयत्ता दहावीपासून ते सर्वोच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप व शिष्यवृत्ती जाहीर करणे आदी सामाजिक उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवावयाचे आहे. उद्देश चांगला आहे. परंतु उपक्रमाच्या नावावर केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम सुरु आहे. मनोरंजनाचा कार्यक्रम हा उपक्रमाचा एक भाग असू शकतो. परंतु तो उपक्रम नाही. उपक्रम राबवण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे.उदाहरणार्थ तज्ज्ञ मंडळींची नियुक्ती, सल्ला आदी गोष्टीही झालेल्या नाही. मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षात प्रतिष्ठानने १० कोटी रुपये खर्च केले. मात्र हा सर्व खर्च केवळ मनोरंजनात्मक कामांवरच अधिक झाल्याचे दिसून येते.
मुख्यालयात कार्यालय प्रमुखच नाहीदीक्षाभूमी जवळील सामाजिक न्याय भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे मुख्यालय आहे. मुख्यालयतील कामकाज पाहण्यासाठी कार्यालय प्रमुखच नाही. सर्व प्रभारींच्या भरवशावर सुरु आहे. प्रतिष्ठानच्या कामासाठी आवश्यक पदनिश्चिती अद्याप झाली नसल्याची माहिती आहे. तेव्हा कामे कशी होणार, उपक्रम कसे राबवणार.