शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
3
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
4
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
5
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
6
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
7
ग्राहकाचे 50 पैसे ठेवणं डाक विभागाला भोवलं! आता भरपाई पोटी किती रुपये द्यावे लागणार? निकाल जाणून थक्क व्हाल!
8
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
9
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?
11
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
12
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
13
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
14
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
15
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
17
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
18
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
19
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
20
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन समाजासाठी दिशादर्शक : प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे

By आनंद डेकाटे | Published: March 27, 2023 5:33 PM

'जनता' खंड - ग्रंथभेट कार्यक्रम

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या जनता पाक्षिकाने गुलामगिरी विरुद्ध बंड करण्याची प्रेरणा दिली. त्यांचे विचारधन आज समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपण सामूहिकपणे पार पाडली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन समाजासाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागात सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'जनता' वृत्तपत्र खंडांचा ग्रंथभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम प्रमुख अतिथी होते. याप्रसंगी डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जनता खंड क्र. - १ व जनता खंड क्र. - २ हे दोन खंड ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले.

डॉ. प्रदीप आगलावे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे सद्यस्थितीत प्रकाशित होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावर प्रकाशझोत टाकला. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले. संचालन डॉ. सरोज डांगे यांनी केले तर आभार प्रा. मंगेश जुनघरे यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ. रमेश शंभरकर, डॉ. धनराज डहाट, प्रा. प्रीती वानखेडे तसेच अन्य सहकारी प्राध्यापक व विभागातील शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित हाेते.- ७ वर्षात केवळ दोनच खंड प्रकाशित

डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी यावेळी सांगितले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'जनता' वृत्तपत्र २४ खंडात प्रकाशित करुन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये २०१६ वर्षी सामंजस्य करार झाला होता.व त्यानुसार जनता पाक्षिकाच्या प्रती विद्यापीठादवारे शासनास देण्यात आल्या होत्या. करारात २४ खंड ५ वर्षात प्रकाशित करण्याची अट होती.पंरतु ७ वर्ष लोटले तरी शासनाने फक्त २ खंड प्रकाशित केले आहेत. शासनाने करारनामा नुसार सर्व खंड प्रकाशित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ