लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी उद्यान परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तोडणाऱ्या मेसर्स गरुडा ॲम्युझमेंट पार्क आणि अटींचे उल्लंघन करणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाविरोधात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी अंबाझरी पोलिसात तक्रार दाखल करून, दोषीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अंबाझरी उद्यान परिसरातील ४४ एकर जागेचा विकास करण्याची तयारी नासुप्रने दर्शविली होती. यासाठी शासनाकडे कोणत्याही स्वरूपाच्या निधीची मागणी केली नव्हती. मात्र हा प्रकल्प विकासासाठी नासुप्रला न देता खासगी खासगी कंपनीला देण्यात आला. ही प्रक्रिया बेकायदेशीर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तोडणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करून न्यायालयीन प्रक्रियेनुसार कार्यवाही करावी, अशी मागणी तक्रारीत केली आहे.
शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर गजभिये, नगरसेवक संदीप सहारे, स्नेहा निकोसे, विवेक निकोसे, त्रिशरण सहारे, सूरज आवळे, पवन सोमकुवर, पीयूष लाडे, अनमोल लोणारे, टिक्कू कांबळे, प्रशांत उके, संदीप मडके, सन्नी पांडे, पूर्वेश बोरकर, संतोष लोणारे, बादल वाहणे, हर्षल पाल, आशिष सार्वे, विक्रांत खंडारे, उज्ज्वल राहाटे, माेहित खडसे, राज खत्री, मंगेश वानखेडे आदींचा समावेश होता.