नागपूर : दीक्षाभूमी परिसरात नागपूर सुधार प्रन्यासतर्फे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, संशोधन केंद्र आणि ग्रंथालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १७ आॅक्टोबरला सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी राहतील. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडेले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रवीण दटके, खा. विजय दर्डा, खा. अजय संचेती. खा. अविनाश पांडे, आ. नागो गाणार, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, आ. राजेंद्र मुळक, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे, नगरसेविका विशखा मैंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, पालक सचिव प्रवीण दराडे, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील.(प्रतिनिधी)
डॉ. आंबेडकर सभागृहाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By admin | Published: October 17, 2015 3:14 AM