शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

उपराजधानीतील डॉ. समीर पालतेवारविरुद्ध गुन्हा दाखल; लाखोंची केली अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 2:55 PM

Nagpur News रुग्णांकडून जास्तीची रक्कम घेऊन संगणकात कमी रकमेची नोंद करून फसवणूक केल्याप्रकरणी मेडिट्रीना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर पालतेवार यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देसंगणकीय प्रणालीचा दुरूपयोग 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - रुग्णांकडून जास्तीची रक्कम घेऊन संगणकात कमी रकमेची नोंद करून फसवणूक केल्याप्रकरणी मेडिट्रीना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर पालतेवार यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली ते गणेश रामचंद्र चक्करवार हे मेडिट्रीना हॉस्पिटलचे संस्थापक संचालक आहेत.व्हीआरजी हेल्थकेअर प्रा. लिमिटेड या कंपनीअंतर्गत संचालित केलेल्या जाणाऱ्या मेडीट्रिना हॉस्पिटलमध्ये २००७ पासून ते भागीदार आहेत. आयकर सल्लागार म्हणून काम करणाºया गणेश चक्करवार यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी आणि कंपनीच्या ईतर विश्वस्तांनी डॉ. पालतेवार यांच्यावर विश्वास टाकून हॉस्पिटलच्या कामकाजाची जबाबादारी सोपवली. त्याचा गैरफायदा घेत पालतेवारांनी हॉस्पिटलमध्ये रकमेची अफरातफर सुरू केली.जवाहरनगर भंडारा येथील विवेकानंद हटवार, भद्रावती (जि. चंद्रपूर) येथील पुरुषोत्तम खापर्डे आणि रामटेक येथील वसंत डांबरे यांच्याकडून उपचाराच्या नावाखाली अनुक्रमे २, ८६,०००, २,९९,६९३ आणि ३, ६२,८२० रुपयांचे बील देण्यात आले.प्रत्यक्षात हॉस्पिटलच्या रेकॉर्डवर अनुक्रमे ७३ हजार ६००, २ लाख, ६९३ आणि १ लाख ३७ हजार ८८०रुपये दाखवण्यात आले.अशा प्रकारे संगणकीय प्रणालीचा गैरवापर करून डॉ. पालतेवार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ५ लाख, ३६ हजार, ४१५ रुपयांची अफरातफर केली. हा गैरप्रकार पुढे आल्यानंतर पालतेवारांना विचारणा केली असता त्यांनी चक्करवार यांच्याशी असभ्य वर्तन करून त्यांना धमकावले. या आणि अशा अनेक गैरप्रकाराची तक्रार चक्करवार यांनी दोन वर्षांपूर्वी पोलीस आणि संबंधित वरिष्ठांकडे केली. मात्र, पालतेवारांशी मधूर संबंध असल्याने त्यावेळीच्या पोलीस अधिकाºयांनी गुन्हा दाखल करूनही पालतेवारांवर विशेष मेहरबानी दाखवली.चक्करवारांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे आता त्याची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, शनिवारी सीताबर्डी पोलिसांनी डॉ. पालतेवारविरुद्ध फसवणूकीच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.तर मोठे घोटाळे उजेडातडॉ. पालतेवारांना पाठीशी घालणारा एक मोठा ब्रोकर शहरात आहे. तो नेहमी सेटिंगसाठी धावपळ करतो. आता पोलिसांनी कडक भूमीका घेऊन पालतेवारांना बेड्या ठोकल्यास मेडिट्रीनामधील अनेक घोटाळे उघड होऊ शकतात.य

टॅग्स :fraudधोकेबाजी