- गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पार पडणार ऑनलाईन सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने ३०व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाचे आयोजन ३० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा ऑनलाईन पार पडणार आहे.
यंदाचा हा समारोह ‘आजादी के अमृत महोत्सव’ अंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना समर्पित असेल. तीनही दिवस संध्याकाळी ६ वाजता समारोहातील कार्यक्रम दमक्षेच्या युट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहे. ३० जुलै रोजी पं. जयतीर्थ मेऊंडी यांचे शास्त्रीय गायन व पद्मश्री पं. भजन सोपोरी यांचे संतूरवादन होईल. ३१ जुलै रोजी अनिरुद्ध देशपांडे यांचे शास्त्रीय गायन, डॉ. पल्लवी किशन यांचे कथ्थक डान्स बॅले व पं. प्रवीण गोडखिंडी व शादज गोडखिंडी यांची बासरी जुगलबंदी रंगेल. १ ऑगस्ट रोजी संपदा माने यांच्याद्वारे मैफिल नाट्यसंपदेचे सादरीकरण होईल आणि समारोहाचा समारोप करण्यात येईल.
....................