लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. वेदप्रकाश मिश्रा व प्रशासनात शीतयुद्ध सुरू आहे. त्यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या मातोश्री स्मृती व्याख्यानासाठी दीक्षांत सभागृह न दिल्याने डॉ. मिश्रा यांनी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. विद्यापीठाने प्रदान केलेला जीवन साधना पुरस्कार परत करण्याची त्यांनी घोषणा केली असून तसे पत्रदेखील कुलगुरूंना पाठविले आहे.डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या मातोश्री शिवकुमारी मिश्रा यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त ‘आई’ या विषयावर मातोश्री स्मृती व्याख्यानाचे ११ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी विद्यापीठाचे दीक्षांत सभागृह देण्यात यावे, अशी मागणी डॉ. मिश्रा यांच्यावतीने आयोजन समिती अध्यक्ष डॉ. डी. के.अग्रवाल यांनी पत्राच्या माध्यमातून केली. खासगी कार्यक्रमासाठी दीक्षांत सभागृहाचा वापर करता येत नाही, असे कारण देऊन ५ डिसेंबर रोजी कुलगुरूंनी परवानगी देण्यास नकार दिला. त्यामुळे हा कार्यक्रम ‘आयएमए’ सभागृहात आयोजित करावा लागला. त्यानंतर परवानगी का नाकारण्यात आली, याबाबत काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी राज्यपालांकडे तक्रारदेखील केली होती. राज्यपाल कार्यालयाच्या उपसचिवांनी यासंदर्भात कुलगुरूंकडून अहवालदेखील मागविला होता.या प्रकरणावर नाराज झालेल्या डॉ. मिश्रा यांनी विद्यापीठाने प्रदान केलेला जीवन साधना पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी कुलगुरूंना पत्रदेखील लिहिले. हा माझ्या आईचाच नव्हे तर संपूर्ण मातृत्वाचाच अपमान आहे. माझ्या आईच्या आशीर्वादापेक्षा मला कुठलाही पुरस्कार महत्त्वाचा नाही. त्यामुळे मी हा पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे डॉ. मिश्रा यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी डॉ. काणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
डॉ. वेदप्रकाश मिश्रांकडून ‘पुरस्कारवापसी’ : कुलगुरूंच्या धोरणाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 9:28 PM
एकेकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. वेदप्रकाश मिश्रा व प्रशासनात शीतयुद्ध सुरू आहे. त्यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या मातोश्री स्मृती व्याख्यानासाठी दीक्षांत सभागृह न दिल्याने डॉ. मिश्रा यांनी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. विद्यापीठाने प्रदान केलेला जीवन साधना पुरस्कार परत करण्याची त्यांनी घोषणा केली असून तसे पत्रदेखील कुलगुरूंना पाठविले आहे.
ठळक मुद्देमातोश्री स्मृती व्याख्यानाला दिले नाही दीक्षांत सभागृह